शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील अल्पबचत विभागाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:55 IST

अल्पबचत संचालनालय बंद करण्यात आल्याने अल्पबचत अभिकर्त्यांच्या परवान्याबाबतचे सर्व कामकाज आता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दोन वर्षापूर्वीच या विभागातील अनेक महत्त्वाची पदे कमी करण्यात आली होती. आता खऱ्या अर्थाने हा विभाग कायमस्वरूपी बंद होणार आहे.

ठळक मुद्देअल्पबचतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने विभाग होणार कायमस्वरूपी बंद

रत्नागिरी : अल्पबचत संचालनालय बंद करण्यात आल्याने अल्पबचत अभिकर्त्यांच्या परवान्याबाबतचे सर्व कामकाज आता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दोन वर्षापूर्वीच या विभागातील अनेक महत्त्वाची पदे कमी करण्यात आली होती. आता खऱ्या अर्थाने हा विभाग कायमस्वरूपी बंद होणार आहे.शासनाने ३ जानेवारी १९५७ साली अल्पबचत संचालनालयाची स्थापना केली होती. मात्र, २००५पासून महाराष्ट्र शासनाने केंद्रीय कर्ज सहाय्य घेण्यात येऊ नये, असे धोरण अंगिकारले आहे. तसेच नवीन अभिकर्त्यांची नेमणूक, प्रोत्साहनपर अनुदान व योजनांची प्रसिद्धी करणे बंद केले. अल्पबचत संचालनालय व त्याच्या अधिनस्त असलेली विभागीय अल्पबचत कार्यालये व जिल्हा अल्पबचत कार्यालये यामधील पदेही कमी करण्यात आली.१ नोव्हेंबर २०१७पासून अल्पबचत संचालनालयाचे कामकाज पूर्णत: बंद झाल्याने हे संचालनालय कायमस्वरूपी बंद करण्यात आले. २६ आॅक्टोबर २०१७च्या शासन निर्णयानुसार अल्पबचत संचालनालयाकडील अल्पबचत अभिकर्त्यांचे परवाने नूतनीकरणाचे, रद्द करण्याचे कामकाज प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्यात आले होते.मात्र, या निर्णयातही आता बदल करण्यात आला असून, ३ मे रोजी शासनाने प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकानुसार आता अल्पबचत, महिलाप्रधान अभिकर्त्यांच्या परवान्याबाबतचे सर्व कामकाज महसूल विभागाच्या आस्थापनेवरील जिल्हाधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्यात यावे, असा बदल करण्यात आला आहे.

रत्नागिरीतील अल्पबचत विभागाचे काम दोन वर्षापूर्वीच बंद करण्यात आले होते. अभिकर्त्यांच्या परवाना नूतनीकरण आणि रद्द करणे एवढ्याच बाबी जिल्हाधिकारी यांच्या कक्षेत ठेवण्यात आल्या होत्या. आता सर्व कामकाज जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली होणार आहे.अल्पबचत विभाग बंद झाल्याने इमारत रिकामीरत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अल्पबचत विभागाची इमारत असून, यात या विभागाचे कामकाज सुरू होते. मात्र, दोन वर्षापूर्वी अल्पबचत विभाग बंद झाल्याने ही इमारत रिकामी झाली आहे. या इमारतीच्या सभागृहाचा उपयोग मात्र विविध कार्यक्रमांसाठी होत आहे.

टॅग्स :Alpa Bachat Bhawanअल्प बचत भवनRatnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी