शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडे २० पर्यंत सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By शोभना कांबळे | Updated: May 16, 2024 17:45 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सूनपूर्व तयारीसाठी गुरूवारी आढावा बैठक घेण्यात आली.

रत्नागिरी : पाटबंधारे विभागाने नदीपात्रातील गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे. जुन्या इमारती, पूल, शाळा यांचे संबंधित विभागांनी स्ट्रक्चरल ऑडीट करावे. सर्वच विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडे २० मे पर्यंत पाठवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सूनपूर्व तयारीसाठी गुरूवारी आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव आदी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्राकांत सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरण करुन गेल्या वर्षी झालेला सरासरी पाऊस, २०११ ते २०२३ या कालावधित झालेला सरासरी पाऊस, आपत्तींचा पूर्वानुभव, पूर प्रवण, दरड प्रवण गावे, रासायनिक कारखाने, धोकादायक कारखाने आदींबाबत सविस्तर माहिती दिली.जिल्हाधिकारी  सिंह यांनी विभागनिहाय सविस्तर पूर्व तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली सुरु असल्याबाबत गटविकास अधिकारी नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी तपासून खात्री करावी. प्रत्येक तहसीलदारांकडे सॅटेलाईट फोनचे वितरण करा. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्याची तयारी ठेवावी. तालुकास्तरीय यंत्रणेने आपल्याकडील असणारी साधनसामुग्री सुस्थितीत आहे का याची तपासून खात्री करावी.

पाटबंधारे विभागाने नद्यांमधील विशेषत: शहरालगतच्या भागातील गाळ काढण्याचे काम अधिक सक्रीय आणि प्राधान्याने  करावे. धोकादायक ठिकाणी इशारे देणारे फलक उभारावेत. नियंत्रण कक्षाची स्थापना करुन, जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्कात रहावे. आय एम डी कडून पावसाचा इशारा मिळताच, आरोग्य विभागाने आपल्या रुग्णवाहिका त्या-त्या तालुक्यात तयार ठेवाव्यात. आवश्यक ती सर्व पूर्वतयारी ठेवावी. नगरपरिषदांनी आपल्या हद्दीतील जुन्या इमारतींचे ऑडीट करावे. पूर नियंत्रण आराखड्याबरोबरच स्थलांतराचा आराखडाही तयार ठेवावा.

महावितरणने जीर्ण पोल बदलावे, धोकादायक झाडांच्या फांद्या तोडणे जलद कृती पथक तयार करणे आदी कामे करावीत. लोटे एम आय डी सी असोसिएशमची बैठक घेऊन सतर्क करावे. शिक्षण विभागाने धोकादायक शाळा, छत दुरुस्ती आदी बाबतची कामे करावीत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी स्थानिक प्रशासनाने आपल्या स्तरावर बैठक घेवून सुक्ष्म नियोजन करावे. पडलेली झाडे हटवण्यासाठी कटर सारखी साधन सामुग्री व्यवस्थित ठेवावी, अशा सुचना केल्या. या बैठकीला विविध विभागांचे प्रमुख, प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.१५.२० लक्ष घनमीटर गाळ उपसाचिपळूण येथील वाशिष्ठी नदीतून १० लाख ४९ हजार घनमीटर व नाम फौंडेशनमार्फत शिव नदीतून  ४ लाख २ हजार २२२ घनमीटर असा एकूण १५.२० लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी आपल्या सादरीकरणात दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी