शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत २४ पासून जिल्हा कृषी महोत्सव, पशु-पक्षी प्रदर्शन, १८ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 16:19 IST

महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ ते २८ फेब्रुवारीअखेर प्रमोद महाजन क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे जिल्हा कृषी महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे- शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती देणे आदी उद्देशाने आयोजन.तालुक्यातील प्रत्येकी दोन मिळून एकूण १८ शेतकऱ्यांचा सन्मानप्रदर्शनाच्या निमित्ताने एकूण २०० स्टॉल्स - आंबा आणि काजू प्रक्रियेचे स्वतंत्र दालन.

रत्नागिरी : महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ ते २८ फेब्रुवारीअखेर प्रमोद महाजन क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे जिल्हा कृषी महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.शेतकºयांना शासनाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती देणे, संशोधन कृषी तंत्रज्ञान व प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, धान्य व खाद्य महोत्सवाद्वारे थेट विक्रीला चालना देणे, यासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यात दरवर्षी पाच दिवसांचा जिल्हा कृषी महोत्सव साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यासाठी प्रतिजिल्हा १४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.आंबा आणि काजू प्रक्रियेचे स्वतंत्र दालन प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. खते, कीटकनाशके व बियाणी यांचे दालन उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, धान्य महोत्सव बचत गटांच्या उत्पादनाची विक्री व प्रदर्शन, शेतकरी यंत्र व अवजारे दालन, विविध जातींच्या पशु-पक्ष्यांचे प्रदर्शन यांसारखे एकूण २०० स्टॉल प्रदर्शनाच्या निमित्ताने मांडण्यात येणार आहेत.

प्रदर्शनाचे औचित्य साधून तालुक्यातील प्रत्येकी दोन मिळून एकूण १८ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कृषीविषयक परिसंवाद व चर्चासत्र तसेच विक्रेता व खरेदीदार संमेलन भरविण्यात येणार आहे. रत्नागिरी येथे कार्यरत असणाºया एक्झॉटिक कंपनीचे दालन प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.

फळप्रक्रिया करणारी ही कंपनी असून, प्रक्रियेसाठी लागणारा ८० टक्के आंबा परराज्यातून विकत घेते. यावर्षीपासून जिल्ह्यातील आंबा विक्रीला घेण्याची सूचना कंपनीला केली जाणार आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या आंब्याला चांगला भाव देण्यात यावा, अशी मागणी केली जाणार असल्याचे आमदार सामंत यांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्रात बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. कर्नाटक व अन्य राज्यात याचा प्रसार झाला आहे, अशी माहिती पशु विभागातर्फे देण्यात आली. यावेळी विभागीय कृषी अधिकारी आरीफ शहा, जिल्हा उपविभागीय कृषी अधीक्षक एस. एस. जगताप उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagricultureशेती