दापोली : ग्रामसेवक संघटना तालुका शाखा दापोली यांच्यामार्फत व गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांच्या उपस्थितीत किसान भवन दापोली येथील कोविड सेंटरला आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले.
डिजिटल ब्लड प्रेशर चेकअप मशीन १, थर्मल गन २, पल्स ऑक्सिमीटर ३, एन ९५ मास्क ४००, हॅण्ड ग्लोव्हज २००, हेड कॅप ४००, डिस्पोजेबल ५ लेयर मास्क ४०० आदी आरोग्य सुरक्षा सुविधा साहित्य वाटप करण्यात आले. साहित्य कोविड सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिते, डॉ. प्राची श्रीरामे यांच्या ताब्यात हे साहित्य देण्यात आले.
यावेळी दापोली ग्रामसेवक संघटना अध्यक्ष सुरेंद्र महाडिक, सचिव संदीप सकपाळ, जिल्हा सहसचिव सुमित तांबे, माजी चेअरमन व सल्लागार शरद गौरत, तालुका संचालक प्रदीप चव्हाण, कार्यकारी सदस्य अनंत कोळी, रुपेश शिंदे, के. डी. साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.