शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

सिव्हील सर्जनच्या खुर्चीचा वाद पोहोचला किल्लीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 2:54 PM

Hospital, Doctor, Ratnagirinews रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सक पदाच्या खुर्चीवरून काही दिवस वाद रंगला होता. हा वाद शमतो न शमतो तोच आता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निवासस्थानाचा वाद रंगू लागला आहे.

ठळक मुद्देसिव्हील सर्जनच्या खुर्चीचा वाद पोहोचला किल्लीपर्यंतवेळप्रसंगी निवासस्थानाचे कुलूप फोडण्याचा निर्णय

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सक पदाच्या खुर्चीवरून काही दिवस वाद रंगला होता. हा वाद शमतो न शमतो तोच आता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निवासस्थानाचा वाद रंगू लागला आहे.

तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी कुलपाची चावी न दिल्याने नवनियुक्त शल्य चिकित्सकांना निवासस्थान वापरता येत नाही. आता या निवासस्थानाचे कुलूप फोडण्यापर्यंत निर्णय झाल्याचे समजते.तत्कालीन शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांची सोलापूरला विनंती बदली होऊन २ महिने झाले तरी त्यांनी निवासस्थान सोडलेले नाही. रुग्णालय प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही त्यांनी बंगल्याची चावी न दिल्याने नवीन शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.

कोविडचा प्रादुर्भाव वाढलेल्या कालावधीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून वाद सुरू झाला होता. डॉ. बोल्डे शल्य चिकित्सक असताना त्यांचा पदभार डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे देण्यात आला.

यावरून शल्यचिकित्सक पदाची संगीत खुर्ची झाली होती. मात्र, डॉ. बोल्डे यांची याच काळात सोलापूर येथे विनंती बदली झाली, तर डॉ. फुले यांची रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून आरोग्य विभागाने नियुक्ती केली. यामुळे त्या वादावर पडदा पडला.बोल्डे यांची सोलापूरला बदली झाल्यानंतर ५ ऑक्टोबरला त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. मात्र, दोन महिने झाले तरी त्यांनी शासकीय निवासस्थान सोडलेले नाही. निवासस्थानाची चावी त्यांच्याकडे असल्याने विद्यमान शल्य चिकित्सकांना बंगल्यापासून वंचित राहावे लागले आहे.

चावी मिळत नसल्याने डॉ. फुले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकार्‍यांना पत्र देऊन बंगला ताब्यात मिळण्याची विनंती केली आहे. बोल्डे यांनी चावी न दिल्यास वेळप्रसंगी निवासस्थानाचे कुलूप फोडण्याचा निर्णय आता घेण्यात आल्याचेही वृत्त आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरRatnagiriरत्नागिरी