चिपळूण : तालुक्यातील नारदखेरकी आंबवकरवाडी येथील गावठी दारू भट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी धाड टाकत ६४ हजार २०० रुपयांच्या मुद्देमालाची जागीच विल्हेवाट लावली.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी अवैध दारू विरोधात मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत चिपळूण तालुक्यातील नारदखेरकी - आंबवकरवाडी येथे गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार विभागीय उप आयुक्त वाय. एम. पवार, प्रभारी अधीक्षक वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक, रत्नागिरी, लांजा, रत्नागिरी शहर व ग्रामीण या कार्यालयातील निरीक्षक शरद जाधव, निरीक्षक व्ही. एस. मोरे, दुय्यम निरीक्षक ओ. ओ. पाडाळकर, दुय्यम निरीक्षक एस. ए. भगत, दुय्यम निरीक्षक पी. एस. पालकर, सहायक दुय्यम निरीक्षक व्ही. पी. हातिसकर, जवान मलिक धोत्रे, डी. एस. कालेलकर, वैभव सोनवले, ओमकार कांबळे, महिला जवान ए. एम. नागरगोजे यांनी घटनास्थळी धाड टाकली.
यावेळी दारू तयार करण्यासाठी लागणारे जवळपास २८०० लिटर रसायन आढळून आले. भरारी पथकाने ६४ हजार २०० रुपये किमतीच्या मुद्देमालाची जागीच विल्हेवाट लावली. त्या ठिकाणी कोणतीही व्यक्ती आढळून न आल्याने अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
090721\1623-img-20210709-wa0007.jpg
नारदखेरकीतील धाडीत ६४ हजारांच्या मद्याची विल्हेवाट