शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

थेट नगराध्यक्षपदाचे अनेकांना वेध

By admin | Updated: May 11, 2016 23:57 IST

वातावरण तापले : शेट्ये, कीर, मयेकर नावे चर्चेत

रत्नागिरी : राज्य शासनाने थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय जाहीर केल्यानंतर रत्नागिरीत नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले आहे. कोण होणार नगराध्यक्ष, अशी चर्चा सुरू झाली असून, थेट नगराध्यक्ष निवड पध्दतीचा लाभ कोणाला होणार, याबाबत चर्चाही रंगली आहे. याआधी १९८५च्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत ज. शं. केळकर, तर २००१च्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत उमेश शेट्ये विजयी झाले होते. यावेळीही त्यांच्या उमेदवारीची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे कडवे विरोधक मिलिंद कीर यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी मिळणार काय, याबाबतही चर्चेला उधाण आले आहे. रत्नागिरीत याआधी २८ वॉर्ड होते. मात्र, त्याचे आता ३० वॉर्ड करण्यात आले असून, त्याचे एकूण १५ प्रभाग होणार आहेत. शहरात सध्या शिवसेनेचे प्राबल्य आहे. त्यातच गेल्यावेळी भाजपने शिवसेनेला त्यांच्या हक्काचे नगराध्यक्षपद न दिल्याने दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे भाजपबरोबर युती नकोच, अशी भूमिका सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष निवडणुकीत खरे शत्रू ठरणार आहे. भाजपतर्फे विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर पुन्हा इच्छूक आहेत, तर भाजपचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांचे नावही चर्चेत आहे. सेनेतर्फे नगरसेवक बंड्या साळवी, मिलिंद कीर, राहुल पंडित, राजन शेट्ये यांच्याबरोबरच उपजिल्हाप्रमुख राजेश सावंत यांचीही नावे थेट नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची नावे चर्चेत असली तरी उमेश शेट्ये पुन्हा एकदा या शर्यतीत आहेत. (प्रतिनिधी)महेंद्र मयेकरही इच्छुकया थेट निवडणुकीत आपण इच्छुक आहात काय, असे विचारता नगराध्यक्ष महेंद्र मयेकर म्हणाले, गेल्या पावणेदोन वर्षात मी शहरात केलेली कामे पक्षाला माहीत आहेत. त्यामुळे या पदासाठी पक्षाला माझ्या नावाचा प्रथम प्राधान्याने विचार करावा लागेल, असे वाटते, असे सांगून या पदासाठी पुन्हा इच्छुक असल्याची कबुलीच त्यांनी दिली. मात्र, भाजपमध्ये गेल्यावेळी संधी हुकलेले अशोक मयेकर यांचे आव्हान ते कसे परतवणार, असा सवालही निर्माण झाला आहे.शेट्ये प्रबळ दावेदार!थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा रत्नागिरीत त्याचा फायदा उमेश शेट्ये यांना सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. याआधीच्या थेट नगराधध्यक्ष निवडणुकीत ते विजयी झाले होते. अशाच काहीशा गणितांसाठी त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडील उमेदवारीसाठी ते प्रबळ दावेदार ठरू शकतात.