शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

सही प्रकरणाला वेगळे वळण शक्य

By admin | Updated: February 13, 2015 22:57 IST

चौकशीची मागणी : खोटे दाखले देणारी टोळी असण्याची शक्यता

राजापूर : राष्ट्रीयत्त्वाच्या दाखल्यांवर प्रांताधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून ते वितरीत झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर, अनेकांचे धाबे दणाणले आहेत. असे खोटे दाखले देणारी टोळीच राजापूर तहसील व प्रांत कार्यालयाच्या आवारात कार्यरत असल्याचे बोलले जात असून, गेल्या वर्षभराच्या काळात अव्वाच्या सव्वा रक्कम घेऊन, अशा प्रकारे जातीच्या दाखल्यांसहित अनेक प्रकारचे शासकीय दाखले दिले गेल्याचे पुडे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकारात काही शासकीय अधिकारीही सामील असण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे, या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. प्रकरणी संशयित आशिष अरुण शिवणेकर याच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्यानंतर आता राजापूर पोलिसांशी संबधित महा ई-सेवा केंद्र ३ची चौकशी सुरु केली असून, तेथील संपूर्ण दस्तऐवज ताब्यात घेतला आहे.गेले अनेक दिवस प्रांतांंच्या खोट्या सह्या करून विविध प्रकारचे शासकीय दाखले दिले जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. त्यातच बुधवारी प्रांत कार्यालयातच या खोट्या दाखल्यांच्या प्रती मिळाल्याने हे संपूर्ण प्रकरण बाहेर पडले होते. प्रारंभी या प्रकाराकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पत्रकारांपर्यत पोहोचताच कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली . मात्र, प्रांत कार्यालयातील गोल शिक्का सहा महिन्यांपूर्वी चोरीला गेला होता व तोच शिक्का या प्रकरणात वापरला गेल्याचे निदर्शनास आले होते. त्याबाबत कठोर कारवाई करण्यास महसुल प्रशासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे, या प्रकरणात काही महसुली अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा आरोप आता सर्वसामान्यांतून करण्यात येत आहे.या महा ई-सेवा केंद्रातून हे दाखले वितरीत झाले तेथील काही कर्मचारी व तेथे आपल्या कामासाठी बसणाऱ्या काही जणांनी गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत विविध प्रकारचे दाखले लवकर मिळवून देण्यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम स्वीकारली असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्या गोल शिक्क्याबाबत महसूल प्रशासनाने घेतली असती, तर हा प्रकार घडला नसता असे काहींचे म्हणणे आहे. ही बाब त्यावेळी लक्षात येऊनदेखील प्रांंत कार्यालययाने ही बाब गांभिर्याने घेतलेली दिसत नाही. या प्रकरणाचे खरे स्वरुप बाहेर पडेल का, असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे.या गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी आशिष अरूण शिवणेकर याच्या विरोधात राजापूर पोलिसांत भा.दं.वि. कलम ४२०, ४६४, ४६६, ४६७, ४६८ प्रमाणे गुहा नोंद करण्यात आला असून, संबधित संशयित आरोपी फरार असल्याची माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन रामचंद्र काळे यांनी पत्रकारांना दिली आहे. (प्रतिनिधी)राजापूर तालुक्यातील खोट्या सह्यांचे प्रकरण गाजत असतानाच, आता यामागे एक टोळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चौकशीची सुई कोणाकडे याकडे लक्ष.महा ई-सेवा केंद्राच्या चौकशीकडेही लक्ष लागले असून, यामागे नक्की कोण आहे, याचा शोध घेण्याची मागणी केली जात आहे. चौकशीनंचर यामागचे सत्य पुढे येणार आहे.