शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हुकूमशाही वाढली, विद्यार्थीहिताला तिलांजली

By admin | Updated: June 5, 2015 00:19 IST

वरवडे शिक्षण मंडळ : आर्थिक अफरातफर अन् संस्थेच्या कारभाराची बेफिकिरी--शिक्षणात हुकूमशाही-२

रत्नागिरी : वरवडे पंचक्रोशी शिक्षण मंडळाने गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली खरी; पण गेल्या काही दिवसात अध्यक्ष आणि माध्यमिक विद्यालय, वरवडेचे मुख्याध्यापक यांच्या बेपर्वाई आणि हुकूमशाही कारभारामुळे सध्या संस्थेतच गोंधळ निर्माण झाला असून, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे.संस्थेचे अध्यक्ष शरद बोरकर यांच्या मनमानी कारभाराबाबत संस्थेच्या कार्यकारी मंडळातच धुसफूस सुरू आहे. पायकाअंतर्गत एक लाख रुपयांचा निधी वरवडे ग्रामपंचायतीकडे मैदान बनवण्याकरिता २०१४मध्ये वर्ग केला होता. हा निधी ग्रामपंचायतीकडून माध्यमिक विद्यालय, वरवडे या शाळेच्या मैदानासाठी खर्च करण्याचे ठरले. मात्र, मे २०१५पर्यंत शालेय मैदानाचे कोणतेही काम झालेले नाही. या मैदानाचा ठेका समीर शरद बोरकर यांच्याकडे आहे. अंदाजे केवळ ६ लोड चिरा व १ ब्रास पांढरी वाळू मैदानात पडली आहे. याबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांना संस्थेच्या अन्य सदस्यांनी निवेदन सादर केले आहे.१२ मार्च २०१४ ते ८ मार्च २०१५ या कालावधीत मंडळाची एकही बैठक झालेली नाही. १२ मार्चच्या झालेल्या बैठकीत त्यापूर्वीच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. त्याला सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत केवळ दोन पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होऊ शकत नाही, असा पवित्रा घेतला. हा वाद वाढल्याने अध्यक्ष बोरकर हे स्वत: बैठकच सोडून निघून गेले. त्यामुळे बैठक झाली नाही. १९ जानेवारी २0१४ रोजीच्या बैठकीत इतर सदस्यांनी सचिवांना दूरध्वनीव्दारे बैठकीला येण्यासाठी ३० ते ३५ मिनिटे उशिर होत असल्याचे कळवूनही अध्यक्षांनी बैठक सोडून दिली व जाताना इतिवृत्ताची वहीदेखील घेऊन गेले. त्यानंतर माजी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सचिव व इतर सदस्यांनी सभा घेतली. नऊपैकी आठ सदस्यांनी ही सभा घेऊनही ती अध्यक्षांनी ग्राह्य धरली नाही.अशा अनेक कारणांनी अध्यक्षांची मनमानी सुरू असल्याने संस्थेने शैक्षणिक संकुलांकडे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देण्याऐवजी परस्परांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानल्याचे दिसून येते. संस्थेच्या सदस्यांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या. अगदी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचा निकालही अध्यक्षांविरोधात गेला. तरीही अध्यक्षांच्या कारभारात सुधारणा झाली नाही. त्यामुळे संस्थेचे हित बाजूलाच केवळ स्वत:चं हित साधण्यामध्येच संस्थाध्यक्ष मशगुल असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)मुख्याध्यापकांवरही आरोपमाध्यमिक विद्यालय, वरवडेच्या मुख्याध्यापकांवरही याप्रकरणी आरोप आहेत. शाळेच्या बँक खात्यातून अनेकवेळा विनापरवानगी पैसे काढण्यात आले आहेत. त्यासाठी व्यवस्थापक मंडळाची मंजुरीही घेण्यात आलेली नाही. हे पैसे कोणत्या कारणासाठी काढण्यात आले, याचेही मुख्याध्यापकांकडे उत्तर नसल्याने कार्यकारिणीने आक्षेप नोंदवले आहेत. याच ठिकाणी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशार्थी विद्यार्थ्यांकडून देणगी उकळली जात असून, त्याची पावतीही दिली जात नाही. याबाबत मुख्याध्यापकांविरोधात पालकांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारही केल्याचे समजते.