शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

दुर्घटना घडूनही जगबुडी पुलाकडे दुर्लक्षच

By admin | Updated: August 8, 2016 23:41 IST

पुलावरून एकेरी वाहतूक : ७३ वर्षे पूर्ण झालेल्या पुलामुळे धोक्याची टांगती तलवार

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील पूलही धोकादायक बनला आहे. या पुलाची डागडुजी झालेली नाहीच, शिवाय तब्बल ७३ वर्षे या पुलाची आयुमर्यादा टिकवण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न आजवर झालेले नसल्याने हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे या पुलाच्या बाजुला उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलाची उभारणी तातडीने करण्याची मागणी जोर धरत आहे. महाड येथील दुर्घटनेनंतर याठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले असून, पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.मुंबई - गोवा या तत्कालीन १७व्या क्रमांकाच्या महामार्गावरील जगबुडी नदीवरील पूल महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा पूल समजला जातो. ब्रिटिशांनी हा पूल १९४३ साली बांधला. मुंबई - गोवा दरम्यान सर्वच व्यवहार आणि या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने या पुलाला ब्रिटिशांनीही अनन्यसाधारण महत्त्व दिले होते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तीन राज्यांना जोडणारा हा महामार्ग आहे.़ विविध एमआयडीसीचे भवितव्य याच पुलावर अवलंबून आहे. पुलामुळे अवघ्या कोकणातील चाकरमान्यांसाठी मुंबई आणि गोवा मार्ग मध्यावर आला आहे. आज या पुलाची दुर्दशा झाली आहे. ब्रिटिशकालीन असलेला हा पूल अरूंद आहे. या पुलाची कालमर्यादा संपलेली आहे. ब्रिटिश एजन्सीजने याबाबत केंद्र व राज्य सरकारला वारंवार सूचित केले आहे, याला शासकीय यंत्रणेनेही दुजोरा दिला आहे. सन २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीत जगबुडी नदीचे पाणी खेड शहरासह परिसरात घुसले होते. अवघे खेड शहर या पाण्यामध्ये बुडाले होते. घरांसह अनेक व्यापाऱ्यांची दुकाने या पावसाच्या पाण्यात बुडाली होती. याची पाहणी करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने जगबुडी नदीला आलेल्या या पुराची आणि खेड शहरात घुसलेल्या पाण्याची हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पाहणी केली होती. पोलिसांसह प्रशासन हतबल झाले होते. याचवेळी पुलाच्या दोन्ही कोपऱ्यांवर तडे गेले होते. याची पाहणी करण्यासाठी अनेकांनी सरकारकडे गाऱ्हाणी घातली होती. मात्र, तत्कालीन सरकारने याबाबत कोणतीही हालचाल न केल्याने हा पूल अधांतरी राहिला आहे. या पुलाचे दगडी खांब जीर्ण झाल्याने त्यातील दगडांमधील वापरलेले साहित्यदेखील नामशेष झाले आहे. सर्वच पिलर्समध्ये आणि पिलर्सच्या दगडांमध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींनी आपली जागा घेतली आहे. भरणे आणि भरणे नाका या दोन्ही गावातील कचरा आणि इतर घाण याच पुलाच्या दोन्ही बाजुला टाकली जाते. पुलाचा काही भाग कचऱ्यामध्ये अडकून राहिला आहे. जगबुडी आणि चोरद नदी या दोन्ही नद्यांचा संगम या पुलानजीक झाला आहे. पुलाचे संपूर्ण खांब या पाण्याखाली जातात. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा वाढत असल्याने याचा परिणाम या पिलर्सवर होतो. या दोन्ही नद्यांचे पाणी दाभोळ खाडीला मिळते, तर हीच खाडी समुद्राला मिळते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये महाडची पुनरावृत्ती झाल्यास एकही मृतदेह हाती लागणार नसल्याचे एव्हाना शासनाच्या लक्षात यायला हवे.महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, या पुलाच्या शेजारी नवा पूल उभारण्याचे काम सुरू आहे. पण, वर्ष होऊनही हा पूल पूर्णत्त्वास गेलेला नाही. (प्रतिनिधी)कारभार महाडमधून : अतिवृष्टीत पुलाचा काही भाग कोसळलाजगबुडी पुलाचा कारभार आता महाड येथील कार्यालयातून चालत आहे. त्यामुळे येथील लोकांचे अनेक प्रश्नांचे समाधान होऊ शकत नाही़ शिवाय महाड येथील कार्यालयात फोनवर अनेकवेळा अधिकारीच उपलब्ध होत नसल्याचे दिसते.१९ मार्च २०१३ रोजी याच पुलावरून महाकाली ट्रॅव्हल्सची एक आराम बस या पुलावरून कोसळली होती. पुलाच्या दोन्ही बाजूस असलेले कठडे तुटल्याने या आरामबसच्या चालकाला पुलाच्या रूंदीचा अंदाज आला नाही. यात ३४ जणांना प्राण गमवावा लागला होता़ उन्हाळ्यामध्ये निर्माण होत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर याच नदीमध्ये नातूनगर धरणामधील पाणी सोडले जाते. खोपी धरणातील पाणीही याच नदीमध्ये सोडण्यात येते. त्यामुळे उन्हाळ्यात धरणाचे पाणी आणि पावसाळ्यात दोन्ही नद्यांचे वाढते पाणी याच पुलाखालून जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टीमध्ये पाण्याची पातळी वाढल्यानंतर या पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या घरांना पुराच्या पाण्याचा धोका संभवतो़ पण, त्यावर कोणताच तोडगा काढण्यात आलेला नाही.महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक प्रशांत बुरडे हे रत्नागिरी दौऱ्यावर येत असल्याने पोलिसांची सुरक्षा व्यवस्था या पुलावर ठेवण्यात आली आहे़ सन २००५ आणि २०१३मधील या दोन्ही घटनांनंतर सरकारने या पुलाच्या पाहणीचे आदेश दिले होते़ त्या पाहणीनंतरही पूल जैसे थे आहे. मात्र, ब्रिटिशांनी संपलेल्या कालमर्यादेबाबत दिलेल्या सूचनेचे कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.