शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उपनिरीक्षक रिझवानाला डीवायएस्पी व्हायचंय, रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 17:59 IST

रिझवानाने महत्प्रयासाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होत जिल्ह्यातून प्रथम महिला पोलीस उपनिरीक्षक होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. ध्येयवेड्या रिझवानाला आता राज्य सेवा आयोगाची पुढील परीक्षा पास होऊन उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) व्हायचे आहे.

ठळक मुद्देउपनिरीक्षक रिझवानाला डीवायएस्पी व्हायचंयरत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला

मेहरून नाकाडेरत्नागिरी : रिझवानाने महत्प्रयासाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होत जिल्ह्यातून प्रथम महिला पोलीस उपनिरीक्षक होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. ध्येयवेड्या रिझवानाला आता राज्य सेवा आयोगाची पुढील परीक्षा पास होऊन उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) व्हायचे आहे.

उंच स्वप्न बाळगल्यानेच उंच भरारी निश्चितच घेता येते. परंतु त्यासाठीही अविरत कष्ट, चिकाटी, आत्मविश्वास याची गरज आहे. परिस्थिती बेताची असतानाही रिझवानाने  जिद्दीने प्रवास केला. मॅरेथॉन, क्रॉसकंट्री, अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतून राष्ट्रीयस्तरावर यश संपादन करणाऱ्या रिझवानाने रत्नागिरी शहराचे नाव उंचावले आहे. गोदुताई जांभेकर विद्यालयात रिझवानाने शालेय शिक्षण पूर्ण केले. गोगटे कॉलेजमध्ये पदवी घेतल्यानंतर ती विधी परीक्षा उत्तीर्ण झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा देण्याचे ठरविले.

दोन ते तीन वेळा दिलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु तिने चिकाटी सोडली नाही. तिला शिक्षण विस्तार अधिकारी एस. जे. मुरकुटे यांचे मार्गदर्शन लाभले.रिझवानाची कौटुंबिक स्थिती बेताची आहे. आई-वडील दोघेही मजुरीचे काम करीत असतानाच एमआयडीसी येथे जागा घेऊन छोटा व्यवसाय सुरू केला. लेकीची जिद्द पाहून वडिलांनी तिला पाठिंबा दिला. तिच्यासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली. कसलाही कंटाळा न करता, तिने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले आणि यशही मिळविले. उपनिरीक्षक झालेल्या रिझवानाला आता नाशिक येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.बक्षिसाची रक्कमबक्षिसाच्या मिळणाऱ्या रकमेचा विनियोग तिने स्पर्धेसाठी लागणारे साहित्य, प्रवासखर्चासाठी केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मिळालेली सर्व रक्कम तिने आजीच्या आजारपणासाठी खर्च केली. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाRatnagiriरत्नागिरी