शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीचे विभाग नियंत्रक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:24 IST

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अनिल मेहतर यांनी बुलडाणा परिवहन महामंडळात कार्यरत असताना लाचेची मागणी केली. त्यामुळे ...

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अनिल मेहतर यांनी बुलडाणा परिवहन महामंडळात कार्यरत असताना लाचेची मागणी केली. त्यामुळे महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देवोल यांनी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. यंत्र चालन अभियंता विजय दिवटे यांच्याकडे विभाग नियंत्रकाचा पदभार तात्पुरता सुपूर्द केला आहे.बुलडाणा परिवहन महामंडळात विभाग नियंत्रक म्हणून अनिल मेहतर कार्यरत असताना डिसेंबर २०१७ मध्ये १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदारांचे मामेभाऊ हे वाहन परीक्षक या पदावर बुलडाणा आगारामध्ये कार्यरत होते. त्यांची बदली बुलडाणा आगारातून विभागीय कार्यशाळा बुलडाणा येथे करावयाची होती. या अनुषंगाने विभागीय नियंत्रक अनिल दत्तात्रय मेहतर यांच्याकडे बदली करण्याची रीतसर मागणी केली होती; परंतु मेहतर यांनी बदली करण्यासाठी १० हजार रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदाराच्या मामेभावाने याला नकार दिला आणि याबाबत भावाला माहिती देऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्काळ चौकशी करून सापळा रचून मेहतर यांच्यावर कारवाई केली. या प्रकरणामुळे महामंडळाची प्रतिमा मलिन झाली. याबरोबरच लाचेची मागणी केल्याचा ठपका ठेवत महामंडळाने अनिल मेहतर यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. याबाबत अधिक चौकशी सुरू आहे. मात्र, सध्या रत्नागिरी विभागाचा पदभार यंत्र चालन अभियंता विजय दिवटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.