शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

देवरूख : नगर पंचायत : समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न, वाहनचालकांची मोठी गैरसोय -वाहन पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 14:08 IST

देवरूख शहरामध्ये होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी नगर पंचायतीकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना काहीअंशी यशदेखील येत आहे. मात्र, शहरामध्ये विविध कामांकरिता येणाºया नागरिकांच्या वाहनांसाठी

देवरूख : देवरूख शहरामध्ये होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी नगर पंचायतीकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना काहीअंशी यशदेखील येत आहे. मात्र, शहरामध्ये विविध कामांकरिता येणाºया नागरिकांच्या वाहनांसाठी हक्काची पार्किंग सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे शहरातील पार्किंगचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. देवरूख नगर पंचायतीने पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून देणे गरजेचे बनले आहे. 

 देवरूख नगर पंचायत, पोलीस प्रशासनाच्यावतीने शहरात वाहतूककोंडी होऊ नये याकरिता उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये शहरातील व्यापाºयांची बैठक घेऊन त्यांना योग्य सूचना देणे, बैठकीनंतर त्यांना रितसर नोटीस देणे, नोटीस दिल्यानंतर मार्गावर असलेले अतिक्रमण न हटवल्यास कारवाईचे संकेतही देण्यात आले होते. तसेच कारवाईचे संकेत देताना पोलीस प्रशासन, तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी व नगर पंचायतीचे मुख्याधिकाºयांनी बाजारपेठेची प्रत्यक्ष पाहणी करून व्यापाºयांना योग्य त्या सूचनादेखील केल्या होत्या. 

त्यानंतर शहरातील व्यापाºयांनी या सूचनांची अंमलबजावणी करताना गटारावर असणारे दुकानांचे नामफलक हटवून मार्ग मोकळा केला  होता. मात्र, तालुक्याच्या ग्रामीण भागातून देवरुख शहरात विविध कामांसाठी वाहने घेऊन येणाºया नागरिकांना आपली वाहने उभे करून ठेवण्यासाठी हक्काची जागा नसल्याचे चित्र सध्या आहे. देवरूख शहर हे तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असल्याने याठिकाणी पदवी महाविद्यालये, दवाखाने, विविध शासकीय कार्यालये, विविध राष्टयीकृत बँका याचबरोबरच मोठी बाजारपेठ असल्याने तालुक्याच्या कानाकोपºयातून देवरूखमध्ये वाहने घेऊन येणाºयांची संख्या लक्षणीय आहे.

वाहन घेऊन आलेल्यांनी आपली वाहने कोठे उभी करायची? असा प्रश्न त्यांना पडतो. यावेळी दुकानांसमोर वाहने उभी केल्यास वाहतूककोंडी होते. त्यामुळे वाहनांच्या पार्किंगसाठी हक्काची जागा मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी देवरूख बसस्थानकाबाहेर किमान १००पेक्षा अधिक दुचाक ी पार्क होत होत्या. मात्र, गणेशोत्सव काळात वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून देवरूख आगाराच्या जागेत पार्किंग करण्याला सध्या मनाई करण्यात आली आहे.

आगाराची ही जागा असल्याने आगाराने घेतलेला हा निर्णय योग्यच म्हणावा लागेल. मात्र, याठिकाणी उभ्या केल्या जाणाºया दुचाकींसाठी शहरात पर्यायी जागा उपलब्ध झालेली नाही. याकडे देवरूख नगर पंचायतीचेही दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नगर पंचायतीने पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून दिल्यास हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. गेली कित्येक वर्ष शहरात पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून देणार असल्याचे नगर पंचायतीकडून सांगण्यात आले होते. मात्र, ती केवळ घोषणाच ठरली आहे. त्यामुळे देवरूख शहरात पार्किंगचा प्रश्न अजूनही जैसे थेच आहे.

टॅग्स :Parkingपार्किंगRatnagiriरत्नागिरी