शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

युती शासनापासून देवगडला अधोगती

By admin | Updated: May 22, 2016 00:47 IST

प्रकाश राणे यांची टीका : विलास साळसकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर

देवगड : देवगड तालुक्यामध्ये युतीशासन सत्तेत आल्यापासून विकासकामे होणे दूरच रािहली आहेत. यामुळे तालुका विकासकामांपासून अधोगतीकडे गेला आहे. असे असताना शिवसेना तालुकाप्रमुख साळसकर हे विकासकामे करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसून, टीका करणे व तालुक्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांची माहितीच्या अधिकाराने माहिती मिळविणे, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे हा शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांचा उपक्रम असल्याची टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. देवगड येथील काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपतालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, विभागीय अध्यक्ष योगेश चांदोस्कर, शरद ठुकरूल आदी उपस्थित होते. राणे म्हणाले की, राष्ट्रीय पेयजल योजनेमधून मुणगे येथील ९४ लाख ९४ हजार ७०० रूपयांच्या नळ योजनेला मंजुरी मिळून ८६ लाख ३१ हजार ५०० रूपये निधीच्या या योजनेचे काम सुरु झाले. या योजनेचे काम २४ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ या मुदतीत पूर्ण करायचे होते. मात्र, हे काम विहिरीपासून टाकीपर्यंत १ किमीवर पाईपलाईन टाकून उर्वरित काम अपूर्ण ठेवले आहे. असे असताना देखील ४७ लाख रूपये रक्कम ठेकेदाराला अदा केली आहे. हा ठेकेदार कोण याचा शोध राणे यांनी घेण्यापेक्षा याचा सवाल मुणगे ग्रामपंचायतीला विचारावा. मुणगे ग्रामपंचायत ही भाजपच्या ताब्यात असून, तेथे भाजपचे सरपंच कार्यरत आहेत. आमदार राणे यांनी निवडणुकीपूर्वी जनतेच्या संपर्कात राहीन, असे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे त्यांचे नियोजित दौरे असल्यामुळे आश्वासनाची पूर्तता करत असल्याचे प्रकाश राणे यांनी सांगितले. पंचायत समितीच्या सभेमध्ये पाणीटंचाईवर एकही शब्द काढला नाही तर तुमचे सदस्य त्यावेळी काय करत होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पाणीचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम आमदार तथा जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे नसून, गावातील पाणीपुरवठा कमिटीचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पाणीटंचाईच्या २०१५-१६च्या आराखड्यानुसार ९४ विंंधन विहीरींच्या मागणीपैकी ६५ विंंधन विहीरींची अंदाजपत्रके पाठविण्यात आली. त्यापैकी २१ विंंधन विहिरींना मंजुरी मिळाली. मात्र, मे महिना सरत असताना देखील अजूनही एकही काम सुरु का झाले नाही याचा आढावा राणे यांनी पाणीटंचाईच्या बैठकीत का घेतला नाही, या विषयाची परिपूर्ण माहिती न घेता प्रत्येक गोष्टीवर टीका करण्यापेक्षा प्रथम माहिती घ्या व नंतर टीका करा. यापैकी २१ विंेधन विहीरींपैकी ४ विंेधन विहीरींचे बक्षीसपत्र झाले असून, अन्य १७ विंंधन विहीरींचे बक्षिसपत्र अद्यापही झाले नसल्यामुळे कामे प्रलंबित आहेत. कामे पूर्ण होण्यासाठी विलंब लागणार असल्यामुळे आमदारांनी देवगड व जामसंडे शहरात स्थानिक विकासनिधीमधून बोअरवेलची कामे सुचविली. खाकशी, भटवाडी, बेलवाडी, मळई, कट्टा, देवगड नलावडे कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी स्वनिधीतून विकासकामे सुरू आहेत. (प्रतिनिधी)