शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य, रत्नागिरीतील बेमुदत उपोषण रद्द 

By मेहरून नाकाडे | Updated: September 12, 2023 15:46 IST

बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करून काही मागणी मान्य करण्यात आल्या

रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या शासनाने मान्य केल्याने महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले आहे. शिवाय दि. १३ सप्टेंबर पासून रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात येणारे बेमुदत उपोषण रद्द करण्यात आले आहे.राज्याचे उद्योग मंत्री उद्य सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन महामंडळाचे अधिकारी यांच्या समवेत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करून काही मागणी मान्य करण्यात आल्या आहेत. महागाई भत्त्याचा दर ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली होती मात्र ३८ टक्केवरून ४२ टक्के वाढ करण्यासाठी परवानगी दिली. सण, उत्सव अग्रीमाची रक्कम १० हजार वरून १२ हजार ५०० रूपये करण्यास मान्यता देण्यात आली. मागील महागाई भत्त्याच्या थकबाकी तसेच घरभाडे भत्ता व वेतनवाढीतील फरकाबाबत येत्या १५ दिवसात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री यांच्या समवेत संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येणार आहे.

अप्पर सचिव (वित्त), प्रधान सचिव (परिवहन) व उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची समिती नियुक्त करून समितीने शासनाला ६० दिवसात अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत होणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणीची कार्यपध्दती निश्चित करणे, कामगार करार थकबाकी, वेतनवाढीतील विसंगती दूर करणे, सेवानिवृत्तांची प्रलंबित देणी, कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करणे या मागण्यांचा समावेश आहे.राज्य परिवहन महामंडळाने शिस्त व अपिल कार्य पध्दतीमध्ये सुधारणा करणे, अपहार प्रवण बदल्या रद्द करणे, कामगारांविरूध्द प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे मागे घेणे, चालक/वाहक/ महिला कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करणे, राज्य परिवहन कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांना एसटी प्रवासात मोफत पासाची सवलत फरक न मागता लागू करणे तसेच सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना सहा महिन्याएेवजी एक वर्षाचा मोफत पास सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केली आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागले असून कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे. - राजेश मयेकर, विभागिय अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटना

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीST Strikeएसटी संप