शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कलमरोपांची मागणी घटली

By admin | Updated: July 11, 2014 00:03 IST

पाऊस न पडल्याने परिस्थिती

शिवाजी गोरे - दापोली, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृ षी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रावर लाखो कलमांची निर्मिती केली जाते. विद्यापीठाने निर्माण केलेल्या कलमांना शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. परंतु कोकणवगळता राज्यातील अन्य भागात पाऊस न पडल्याने कलमरोपांची मागणी घटली आहे. विद्यापीठाने निर्माण केलेल्या रोपांपैकी केवळ ४० टक्के कलमांची विक्री झाली असून, गेल्या १० वर्षांत जूनपर्यंत सर्वांत कमी मागणी यंदा झाली आहे. मे महिन्यात घाटमाथ्यावर गेलेली कलमेसुद्धा पावसाअभावी करपली असल्याची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ला, कुडाळ, मुळदे, फोंडाघाट, लांजा, के. व्ही. के. लांजा, शिरगाव, भाट्ये, आवाशी, वाकवली, टेटवली, रुखी, आसोंड, श्रीवर्धन, रोपोली, दापोली, रोहा, के. व्ही. के. रोहा पालघर या संशोधन केंद्रांमध्ये कलमांची रोपे निर्माण करुन विक्री केली जाते. कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रातील कलमांना शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. दरवर्षी विद्यापीठाने निर्माण केलेली कलमे व शेतकऱ्यांची मागणी पाहता दरवर्षी शेतकऱ्यांना कलमे अपुरी पडतात. विद्यापीठ शेतकऱ्याची मागणी पूर्ण करु शकत नाही.विद्यापीठाकडून दरवर्षी सुमारे २० ते २५ लाख कलमांची रोपे तयार केली जातात. मात्र, त्यातूनही शेतकऱ्यांची गरज पूर्ण होत नसल्याने काही शेतकऱ्यांना खासगी नर्सरीमधून कलमे घेण्याची वेळ येते. परंतु यंदा परिस्थिती अगदी उलट आहे. कारण यावर्षी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जून महिना कोरडा गेल्याने या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. जनावरे व माणसांना प्यायला पाणी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे कलमे नेऊन लावणार कुठे. कलमांना पाणी कुठून टाकणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असल्याने यावर्षी शेतकऱ्यानी जून महिन्यात कलमांची उचल कमी प्रमाणात केली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कलमांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. दरवर्षी मे - जून महिन्यात सर्वच संशोधन केंद्रातील कलमांची रोपे संपतात. गेल्या १० वर्षांत पहिल्यांदाच कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रातील कलमांची ४० टक्के विक्री झाली आहे. संशोधन केंद्रात कलमे शिल्लक राहिली तर त्याच्या संगोपनाचा खर्चही वाढणार आहे.वर्षनिहाय उत्पादनवर्षआंबाकाजू नारळचिकूआवळाकोकम२००८-०९२,००,०००४,१०,०००८२,०००२२,०००२८,०००४२,०००२००९-१०२,३०,०००४,४०,०००८०,०००२०,०००३०,०००६४,०००२०१०-११२,४१,०००४,११,०००८२,०००१२,०००१२,०००२५,०००२०११-१२२,६१,०००४,३१,०००८५,०००१२,०००१२,०००२५,०००२०१२-१३३,२७,०००४,००,०००९९,०००२२,०००१९,०००१०,०००२०१३-१४६० टक्के शिल्लक