राजापूर : राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी रायपाटण येथील कोविड केअर सेंटरचे लाेकार्पण करण्यात आले़
तत्पूर्वी, रविवारी सकाळी प्रथम ओणी येथील कोविड हॉस्पिटलचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले़ त्यानंतर सायंकाळी रायपाटण येथील उपजिल्हा रुग्णालय येथे ४५ बेडच्या सुसज्ज कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात आले़ यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ़ संजय शिंदे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ़ संघमित्रा फुले-गावडे, उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार वनिता वराळे, जिल्हा परिषदेचे सभापती भारती सरवणकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, रायपाटणचे सरपंच महेंद्र गांगण उपस्थित हाेते़