शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

जिल्ह्यातील लोकसंख्येचा वृद्धीदर होतोय कमी

By admin | Updated: July 11, 2014 00:05 IST

सजगता वाढली : साक्षरता, मर्यादित कुटुंब संकल्पनेचे यश

शोभना कांबळे-  रत्नागिरी . बदलत्या आधुनिक काळानुरूप समाजातही परिवर्तन होऊ लागले आहे. समाज साक्षरतेकडे झपाट्याने जाऊ लागला. मात्र, महागाईचाही आलेख तेवढाच उंचावत असल्याने आर्थिकदृष्टीने समाजातील काही संकल्पनांना छेद देण्याची वेळ आली. त्यातील महत्त्वाची संकल्पना म्हणजे मर्यादित कुटुंब. याबाबत समाजात सजगता वाढल्याने जिल्ह्याच्या लोकसंख्येत घट झाल्याचे चित्र २०११ साली झालेल्या जनगणनेवरून दिसून येते. त्याचबरोबर कोकण रेल्वेच्या निर्मितीमुळे अर्थार्जनासाठी बाहेर जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. १९९१ ते २००० या कालावधीत लोकसंख्या वाढीचा वेग ९.८९ टक्के इतका होता. २००१ साली झालेल्या जनगणनेत जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ९७ हजार ७७७ इतकी होती. त्यापैकी १५ लाख ०४ हजार ५६८ इतकी लोकसंख्या ग्रामीण भागात होती. शहराची लोकसंख्या १ लाख ९२ हजार २०९ इतकी होती. गेल्या दहा वर्षात म्हणजेच २००१ ते २०१० या दशकातील लोकसंख्या १६ लाख १५ हजार ०६९ झाली असून, आताचा वृद्धीदर (-) ४.९६ इतका कमी झाला आहे. विशेषत: ग्रामीण भागातील लोकसंख्येत घट झाली असून, आता १३ लाख ५१ हजार ३४६ इतकी आहे. म्हणजेच लोकसंख्या १,५३,२२२ने घटली आहे. शहरी भागात केवळ २२८३ ने वाढ झाली आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे मर्यादित कुटुंबाची संकल्पना. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे पूर्वी ‘हम दो हमारे दो’ हा विचारही आता बाजुला पडू लागला असून, ‘हम दो हमारा एक’ या विचारांवर आता बरीच दाम्पत्ये ठाम असलेली दिसतात. यात शासनाच्या या संकल्पनेचेही यश मानायला हरकत नाही. तसेच पती-पत्नी दोघेही अर्थार्जन करणारे असल्याने सर्वच दृष्ट्या कुटुंबातील सदस्य संख्या कमी असण्यावर अधिक भर दिला जात आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वेचा परिणामही जिल्ह्यातील लोकसंख्या कमी होण्यावर झाल्याचे दिसून येते. कारण आता अर्थार्जनासाठी इतर ठिकाणी जाण्याची मानसिकता वाढू लागली आहे.......१९९१ ते २००० या दशकात लोकसंख्या वाढीचा दर ९.८९ इतका होता, तर २००१ ते २०१० या दशकात तो ४.९६ इतका कमी झाला. तालुका२००१२०११मंडणगड७०,५९३६२,१२३दापोली१,९३,४३०१,७८,३४०खेड१,९४,५१५१,८१,६१५चिपळूण२,८१,०८१२,७९,१२२गुहागर१,४२,२५९१,२३,२०९रत्नागिरी३,०२,२६१३,१९,४४९संगमेश्वर२,१४,८१९१,९८,३४३लांजा१,१३,१५३१,०६,९८६राजापूर १,८४,६६६१,६५,८८२एकूण१६,९६,७७७ ६,१५,०६९२००१ सालच्या जनगणनेुसार रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार पुरूषांमागे स्त्रियांची संख्या ११३६ इतकी होती. मात्र, २०११ साली स्त्रियांची संख्या ११२२ इतकी आहे. मंडणगड तालुक्यात सर्वाधिक १२१९, तर सर्वांत कमी रत्नागिरी तालुक्यात १०५३ इतकी आहे. २००१ साली झालेल्या जनगणनेवेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या १५,०४,५६८ इतकी होती, तर शहरी भागात १,९२,२०९ इतकी होती. २०११ साली हीच लोकसंख्या ग्रामीण १३,५१,३४६ इतकी झाली आहे, तर शहरी लोकसंख्या १६,५१०६९ इतकी आहे.