शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर दरीत कोसळून महिलेचा मृत्यू

By admin | Updated: March 26, 2017 22:40 IST

१४ जण जखमी; कासे पेढांबे येथील घटना; मोठा अनर्थ टळला

असुर्डे : संगमेश्वर तालुक्यातील कासे पेढांबे बौद्धवाडीजवळ रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रस्ता करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणाऱ्या मजुरांच्या ट्रॅक्टरची ट्रॉली दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. प्रेमा आकाश राठोड (वय २५, विजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हडकणी (चिपळूण) येथे राहणारे लमाणी समाजातील मजूर आपल्या वस्तीवरून संगमेश्वर तालुक्यातील कासे पेढांबे येथे रस्त्याच्या कामासाठी निघाले होते. मुकादम राठोड यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून सुमारे २५जण सावर्डे मार्गे कासेच्या दिशेने नायशीतून पुढे जात असताना पेढांबे बौद्धवाडीजवळ हा अपघात झाला. ट्रॅक्टरचालकाचा ताबा सुटल्याने तो ट्रॉलीसह दरीत कोसळला. अपघातामध्ये ट्रॅक्टर-ट्रॉलीने दोन पलटी घेतल्यामुळे ट्रॉलीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी दुखापत झाली. यामध्ये सुरेखा कृष्णा राठोड (१८), श्रीदेवी पांडुरंग चव्हाण (२०), पांडुरंग भिलू चव्हाण (५५), किरण खेमू जाधव (२१), योगेश खेमू जाधव (३२), सुनील बाबू राठोड (१८), पुतळाबाई कृष्णा राठोड (४५), अशोक नरसू राठोड (३५), रुकमाबाई काशिनाथ चव्हाण (४५), श्रीकांत गंगाराम राठोड (४५), पारुबाई एकनाथ जाधव (३०), रमेश चंद्रकांत खेतरे (२४), रोहित मोहन राठोड (३), संतोष राठोड (२५) (विजापूर कर्नाटक) यांचा समावेश आहे.या अपघातात प्रेमा आकाश राठोड ही महिला अत्यवस्थ होती. तिला उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात आणत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. अन्य अपघातग्रस्तांवर डेरवण येथे उपचार सुरू आहेत. या अपघातग्रस्तांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ट्रॉलीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती समजताच संगमेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत माखजन पोलिस चौकीतील हेड कॉन्स्टेबल दीपक पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. (वार्ताहर)