शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

भिरकोंड येथे बिबट्याचा भुकेने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 19:35 IST

भुकेने व्याकूळ होऊन बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना डिंगणी रोडवरील भिरकोंड - गुरववाडी येथे घडली.

ठळक मुद्देभिरकोंड येथे बिबट्याचा भुकेने मृत्यूपरिमंडल वन अधिकारी घटनास्थळी

देवरूख : भुकेने व्याकूळ होऊन बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना डिंगणी रोडवरील भिरकोंड - गुरववाडी येथे घडली.भिरकोंड - गुरववाडी येथे मृत अवस्थेत बिबट्याचे पिल्लू दिसले. ते सुमारे वर्षभराचे असल्याचे परिमंडल वन अधिकारी विजयराज सुर्वे यांनी सांगितले. परिमंडल वन अधिकारी सुरेश उपरे, वनरक्षक एन. एस. गावडे, शर्वरी कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

बिबट्या भिरकोंड गुरववाडी येथील गणपत गुरव यांच्या घराशेजारी आढळला. हा बिबट्या झोपलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसून आल्यानंतर त्यांनी ही खबर पोलीसपाटील सुभाष गुरव यांना दिली. गुरव यांनी देवरूख वन विभागाला माहिती दिली.त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. त्यांनी शवविच्छेदन केले. या दरम्यान बिबट्याच्या पोटात अन्नाचा एकही कण नसल्याचे आढळून आले. अनेक दिवस भुकेने व्याकूळ असल्यानेच त्याने प्राण सोडल्याचे स्पष्ट झाले. या मृत बिबट्यावर वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वाहनांच्या धडकेत आणि भुकेमुळे बिबटे मरण्याच्या प्रमाणात अलिकडे वाढ होत आहे.महिन्यातील तिसरी घटनासंगमेश्वर तालुक्यात बिबट्या मृत होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात सावजाच्या पाठीमागे पोलवर चढलेला बिबट्या विजेचा धक्का लागून मृत झाला होता, तर तुरळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत गतप्राण झाला होता. भिरकोेंडमधील ही तिसरी घटना आहे.

टॅग्स :leopardबिबट्याRatnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग