शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

'दापोलीत दळवींना धक्का

By admin | Updated: October 20, 2014 00:44 IST

षटकार चुकला : रत्नागिरी, राजापूर, चिपळूण शिवसेनेकडे; चार विद्यमान पुन्हा विधानसभेत

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्ष प्रथमच स्वबळावर लढल्यानंतरही रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांचा कौल कायमच राहिला. जिल्ह्यात शिवसेना तीन, तर राष्ट्रवादी दोन जागी विजयी झाल्याने याआधीचे पक्षीय बलाबल कायम राहिले आहे. दापोली मतदारसंघातून विजयाचा षटकार मारण्याच्या तयारीत असलेले शिवसेनेचे सूर्यकांत दळवी हे जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांच्याकडून झेलबाद झाले, तर पक्षांतर केलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री उदय सामंत रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेकडून विजयी झाले. राजापुरात शिवसेनेचे राजन साळवी, चिपळुणात शिवसेनेचे सदानंद चव्हाण आणि गुहागरात राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी आपापले गड राखले.जिल्ह्यातील पहिला निकाल गुहागर मतदारसंघातून जाहीर करण्यात आला. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे भास्कर जाधव (७२,५२५) यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे डॉ. विनय नातू (३९,७६१) यांचा तब्बल ३२,७६४ मतांनी पराभव केला. चिपळूणची जागा शिवसेनेने स्वत:कडेच राखली. या ठिकाणी सदानंद चव्हाण हे पुन्हा विजयी झाले. त्यांना राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांनी कडवी झुंज दिली. त्यामुळे शेवटच्या पाच फेऱ्यांपर्यंत उत्कंठा लागून राहिली होती. सदानंद चव्हाण यांना ७५,६९५ तर शेखर निकम यांना ६९,६२७ मते मिळाली. रत्नागिरी मतदारसंघात राष्ट्रवादीतून शिवसेनेच्या गोटात दाखल झालेल्या उदय सामंत यांनी भाजपचे बाळ माने यांचा ३९,४२७ मतांनी पराभव केला. उदय सामंत यांना ९३,८७६ तर बाळ माने यांना ५४,४४९ मते मिळाली.राजापूर मतदारसंघात शिवसेनेच्या राजन साळवी यांनी काँग्रेसच्या राजन देसाई यांचा ३९,०६२ मतांनी पराभव केला. साळवी यांना ७६,२६६ तर देसाई यांना ३७,२०४ मते मिळाली. अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या दापोली मतदारसंघात राष्ट्रवादीचे नवखे उमेदवार व जिल्हा परिषद सदस्य संजय कदम यांनी शिवसेनेचे पाचवेळा आमदारकी भूषवणाऱ्या सूर्यकांत दळवी यांना अनपेक्षितपणे नमवत विजयश्री खेचून आणली. या ठिकाणी अटीतटीची लढत झाली. त्यात कदम ३,६४३ मतांनी विजयी झाले. कदम यांना ५२,५९५ तर दळवी यांना ४८,९५२ मते मिळाली. या ठिकाणी राष्ट्रवादीत बंडखोरी होऊनही कदम यांनी आमदारकी मिळवली. (प्रतिनिधी)विजय तोच, जागा बदललीजिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील यशावर नजर टाकल्यास मागील निवडणुकीच्या तुलनेत पक्षीय बलाबल याही निवडणुकीत कायम राहिले. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी दोन, तर शिवसेना तीन, असे पक्षीय बलाबल होते. ते कायम राहिले आहे. मात्र, मागील निवडणुकीत रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीकडे, तर दापोलीची जागा शिवसेनेकडे होती. या निवडणुकीत या दोन मतदारसंघातील पक्ष बदलले आहेत. भाजपच्या पदरी भोपळाजिल्ह्यातील भाजपच्या पाचही उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचारसभा रत्नागिरी येथे घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही भाजपच्या पदरी निराशाच आली. जिल्ह्यात भाजपला आपले खातेही उघडता आले नाही.