शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

नृत्यातून होते आनंदप्राप्ती

By admin | Updated: May 11, 2016 00:09 IST

‘प्रयास १००’मध्ये जमेनीस यांचे मत

रत्नागिरी : नियमित सराव व अखंड परिश्रमाने शास्त्रीय नृत्यात नैपुण्य मिळवता येते. नृत्य माझी पहिली आवड आहे. अभिनयामुळे मी २४ तास प्रेक्षकांसमोर राहिले असते, परंतु त्यातून आनंदप्राप्ती झाली नसती. नृत्यातूनच मला खरी आनंदप्राप्ती होते, असे प्रतिपादन नृत्यांगना शर्वरी जमेनीस हिने केले.साईश्री-वेदश्री आयोजित ‘प्रयास १०० प्लस’ कार्यक्रमात शर्वरी जमेनीस बोलत होत्या. एकाच वेळी १३० नृत्यांगनांनी सादर केलेल्या अविष्काराने रत्नागिरीतील रसिक प्रेक्षकांची मने जिंकली, तर सावनी रवींद्र या गायिकेने सादर केलेल्या गीतांमुळे कार्यक्रमास बहर आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी मिताली भिडे यांनी गणेशवंदना, रूपाली भिडे यांनी दुर्गावंदना सादर केली. मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ‘नाही कळलं कधी..’, ‘गोऱ्या गोऱ्या गालावर चढली लाली...’ गीते सादर केली. ‘सांज येवो गोकुळी सावळी सावळी गीतावर नृत्यांगनांनी भरतनाट्यम्, कथ्थक नृत्य सादर केले. या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, रवींद्र घांगुर्डे, गोपाळ जोशी, चंद्रकांत भिडे, शशी भिडे, शशिताई भिडे, प्रवीण मलुष्टे, दीपक साळवी उपस्थित होते. संयोजकांतर्फे मान्यवरांचा गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)