शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दलित मित्र तात्या कोवळे काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 17:09 IST

चिपळूणच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीचे अभ्यासक व इतिहासाचे साक्षीदार, ज्येष्ठ समाजवादी, दलित मित्र व लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे माजी अध्यक्ष रघुवीर भास्कर उर्फ तात्या कोवळे (९७) यांचे मंगळवारी वृध्दापकाळाने निधन झाले.

ठळक मुद्देदलित मित्र तात्या कोवळे काळाच्या पडद्याआडतात्या चिपळूणच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीचे अभ्यासक

चिपळूण : चिपळूणच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीचे अभ्यासक व इतिहासाचे साक्षीदार, ज्येष्ठ समाजवादी, दलित मित्र व लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे माजी अध्यक्ष रघुवीर भास्कर उर्फ तात्या कोवळे (९७) यांचे मंगळवारी वृध्दापकाळाने निधन झाले.तात्या कोवळे हे सध्याच्या परांजपे हायस्कूल तर पूर्वीच्या श्रीराम हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवेत होते. चिपळूण शहरातील वडनाका येथील राजगृह येथील त्यांच्या निवासस्थानी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भेट दिली होती. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभला होता.

तात्या स्वातंत्र्यसैनिक होते. त्याबरोबरच गांधीवादीसुध्दा होते. पूज्य गांधी प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष होते. प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. शहरातील गांधारेश्वर येथील गांधी स्मारक उभारण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे १९८७-८८ मध्ये समाज सेवेच्या मौलिक कार्याबद्दल तात्या कोवळे यांना दलित मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. शहरातील अनेक संस्थांशी ते संबंधित होते. उत्तम वक्ते व लेखक असा त्यांचा लौकिक होता. त्यांनी काही पुस्तकेही लिहिली होती. त्यांच्यावर शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी