शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
2
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
3
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
4
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
5
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
6
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
7
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
8
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
9
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
10
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
11
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
12
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
13
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
14
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
15
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
16
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
17
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
18
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
19
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
20
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: September 30, 2016 03:22 IST

तो दुपारी १.४५ च्या सुमारास गोकुळपेठ भाजी बाजारात आला. त्याच्यासोबत पल्सरवर सुरेश होता.

नागपूर : तो दुपारी १.४५ च्या सुमारास गोकुळपेठ भाजी बाजारात आला. त्याच्यासोबत पल्सरवर सुरेश होता. या दोघांनी चहा घेतल्यानंतर बऱ्याच वेळेपासून दोन कार आणि एका दुचाकीवर प्रतिस्पर्धी टोळीतील काही जण पाठलाग करीत असल्याचे सचिनच्या लक्षात आले. त्यामुळे सचिन भाजीबाजारातून सटकण्याच्या विचारात होता. भरबाजारात अन् ऐन पोलीस चौकीसमोर घडलेल्या या थरारक घटनेमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. अंबाझरी, सीताबर्डी पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. माहिती कळताच सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त राकेश कलासागर, सहायक पोलीस आयुक्त रिना जनबंधू यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अंबाझरीचे ठाणेदार किशोर सुपारे, सीताबर्डीचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतल्यानंतर आरोपींपैकी तिघांची नावे पुढे आली. सूरजच्या तक्रारीवरून अंबाझरी ठाण्यात राजा आणि साथीदारांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. परतेकी हा कुख्यात गुंड असून, खंडणी वसुलीसह अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्यासोबत दोन मोठ्या वाहनात आठ ते दहा साथीदार होते. गोळ्या झाडल्यानंतर याच वाहनातून आरोपी पळून गेल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पोलिसांची विविध पथके आरोपींना शोधण्यासाठी कामी लागली. काही वेळेतच अंकित पाली आणि बिट्टू ऊर्फ अशपाकने पोलिसांकडे शरणागती पत्करल्याचे वृत्त आले. त्यानंतर राजा परतेकीलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, पोलीस त्याबाबत माहिती देण्याचे टाळत होते. (प्रतिनिधी)मांडवली फिस्कटली सचिनचा अलीकडे मोठा दरारा वाढला होता. त्याने खंडणी वसुलीसोबतच दारूचा धंदाही सुरू केला होता. राज्या परतेकी आणि त्याचे साथीदारही दारूच्या धंद्यात होते. त्यामुळे एका मध्यस्थाने दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्यात मांडवली करण्याचा प्रयत्न केला होता. या मांडवलीच्या बैठकीत सचिन आणि त्याचे साथीदार तसेच राज्या, बिट्टू ऊर्फ अशपाक (मोमीनपुरा) आणि अंकित पाली (सुदामनगरी) होता, अशी माहिती आहे. यावेळी सूरजने दारूचा धंदा सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र, राज्या आणि त्याच्या साथीदारांनी मांडवली करण्यास नकार दिला. यावेळी त्यांच्यातील वैमनस्य तीव्र झाले. त्यानंतर सचिन आपला गेम करेल, अशी भीती वाटत असल्याने राज्याने सचिनचा गेम करण्याची तयारी केली अन् अखेर आज त्याने सचिनची भर बाजारात शेकडो लोकांसमोर हत्या केली.