शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: चिपळूण दुय्यम निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात

By संदीप बांद्रे | Updated: November 3, 2022 00:36 IST

Crime News: पक्षकाराचे खरेदीखत व हक्कसाेड नाेंदणीसाठी ७ हजारांची लाच घेताना चिपळूण येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील निबंधक अधिकारी व त्याच्या खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडले.

- संदीप बांद्रेचिपळूण  -  पक्षकाराचे खरेदीखत व हक्कसाेड नाेंदणीसाठी ७ हजारांची लाच घेताना चिपळूण येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील निबंधक अधिकारी व त्याच्या खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडले. दुय्यम निबंधक अधिकारी प्रशांत रघुनाथ धाेत्रे (४३, मूळ रा. नातूनगर, ता. खेड) व अरविंद बबन पडवेकर (५६, रा. मुरादपूर चिपळूण) असे ताब्यात घेतलेल्या दाेघांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई बुधवारी सायंकाळी चारच्या सुमाराला घडली.

या प्रकरणातील तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून, त्यांच्या पक्षकाराचे खरेदीखत व हक्कसोड नोंदणीसाठी लाच मागण्यात आल्याचे उघड झाले. याबाबत लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीचे खरेदीखत व हक्कसोड नोंदणी करण्यासाठी प्रशांत धोत्रे या अधिकाऱ्याने १० हजारांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने २ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पडताळणी करण्यात आली. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडे खरेदीखत व हक्कसोड कामाचा मोबदला म्हणून ४,५०० रुपये व यापूर्वीच्या कामाची रक्कम मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तडजोडी अंती दुय्यम निबंधक प्रशांत धोत्रे याच्या वतीने ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अरविंद पडवेकर यास ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनंत कावळे, संतोष कोळेकर, दीपक आंबेकर, हेमंत पवार आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. प्रशांत धोत्रे १८ ऑक्टोबर रोजी मुंबई येथून चिपळूण येथे रुजू झाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण