शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

जलप्रदूषणावरून लोटे सीईटीपीवर गुन्हा

By admin | Updated: June 23, 2016 01:10 IST

मंडळाची कारवाई : सहा वर्षांपूर्वीची जनहित याचिका

आवाशी : जलप्रदूषणाच्या कारणावरून सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर (सीईटीपी) निष्क्रियतेचा ठपका ठेवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत खळबळ उडाली आहे. २००२ साली सुरू झालेल्या या प्रकल्पाविरुद्ध प्रथमच प्रदूषणाच्या मुद्द्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.लोटे परशुराम (ता. खेड) या रासायनिक औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कारखान्यांच्या स्थापनेपासूनच जल-वायू प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. सुरुवातीच्या काळात कमी कारखानदारी असल्याने त्याचे स्वरूप लहान होते. मागाहून वाढलेल्या कारखानदारांचे सांडपाणी प्रक्रिया करून सोडण्यासाठी २००२ मध्ये सीईटीपीची स्थापना करण्यात आली. हा प्रकल्प जरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा असला तरी त्यावर येथीलच उद्योजकांचे मंडळ काम पाहू लागले. तेव्हापासूनच जल-वायू प्रदूषणात वाढ झाली. सातत्याने मासे मरतूक होणे, शेती, फळबागांना धोका पोहोचणे, वायू प्रदूषणाने आरोग्य धोक्यात येणे या घटना घडू लागल्या. याची दखल घेत मुंबई येथील एक सामाजिक संस्था निकोलास आलमेडा यांनी २०१० मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांपासून मेंबर आॅफ सेक्रेटरीपर्यंत सर्वांना न्यायालयाने चौकशीसाठी बोलावणे सुरू केले. ही प्रक्रिया २०१५ पर्यंत सुरूच राहिली. अखेर आम्ही हा प्रकल्प चालवित नसून, तेथील स्थानिक उद्योजकांचे मंडळ त्याचा कारभार सांभाळतात, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगून सीईटीपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीईटीपीचे विद्यमान अध्यक्ष सतीश वाघ, उपाध्यक्ष डी. के. शेणाय, संचालक मिलिंद बापट, मिलिंद बारटक्के, राजेश तिवारी, विश्वास खाडीलकर, सुचेता लाड, अंजली ओगले, सुशील कांबळे, प्रशांत जोशी, गौतम मखारिया या संचालकांसह सीईटीपी व्यवस्थापक शरद फौजदार यांना खेडच्या दिवाणी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स न्यायालयाकडून जारी करण्यात आले आहे. यापैकी फौजदार हे न्यायालयात हजर झाले असून, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, एकही संचालक अजून हजर झालेला नसल्याचे समजते. याबाबत लोटे पोलिसांकडे संपर्क साधला असता आम्ही केवळ आलेले समन्स बजावले असून, इतर कोणतीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. संचालक मंडळापैकी मिलिंद बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, जल प्रदूषणाचा मुद्दा त्याचबरोबर मागील तीन वर्षांपासून सीईटीपीचे रखडलेले विस्तारीकरण व अन्य बाबींचा ठपका ठेवत प्रदूषण नियंत्रण मंडळाने सीईटीपीवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, लवकरच विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असून, त्याचे भूमिपूजनही केले आहे. उर्वरित बाबींबद्दल आम्ही आमचे म्हणणे न्यायालयासमोर मांडू. बापट यांच्यासह अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. लोटेसह तारापूर, रोहा, सोलापूर व कुरकुंब येथील सीईटीपीवरही गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. (वार्ताहर)\संचालकांचे राजीनामे?या घटनेनंतर सीईटीपी लोटेच्या बहुतांश संचालकांनी तत्काळ राजीनामा दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दोन दिवसांपूर्वी सोनपात्रा नदीत मासे मृत झाल्याच्या घटनेला व संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाल्याच्या घटनेला काही अवधी लोटतो न लोटतो तोच मंगळवारी सायंकाळी पुन्हा कोतवली नदीत मासे मृत झाल्याचे वृत्त तेथील ग्रामस्थांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. तलाठ्यांनी त्याचा पंचनामा केल्याचेही सांगितले.