शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी कार्ट, आंबव येथील विद्यार्थ्यांकडून निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 17:19 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरण केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कार्टची निर्मिती केली आहे. या तंत्राद्वारे रुग्णांना अन्न व औषध देणे सोपे होणार आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क येणार नाही.

ठळक मुद्देआरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी कार्ट, आंबव येथील विद्यार्थ्यांकडून निर्मितीरुग्णांशी थेट संपर्क टाळणे शक्य, अन्न, औषध देणे होणार सोपे

देवरूख : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरण केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कार्टची निर्मिती केली आहे. या तंत्राद्वारे रुग्णांना अन्न व औषध देणे सोपे होणार आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क येणार नाही.संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील स्व. मीनाताई ठाकरे हायस्कूल व अन्य ठिकाणी विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. विलगीकरण केंद्रामध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णाची देखरेख करताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. मात्र रुग्णाशी येणारा थेट संपर्कत्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारा आहे. याच अनुषंगाने आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी ब्लूटूथद्वारा नियंत्रित कार्टची निर्मिती केली आहे.ही एक बॅटरीवर चालणारी कार्ट असून, त्याद्वारे १० मीटरपर्यंत आणि जवळपास ९० किलो पर्यंतच्या वजनाची सामुग्रीची ने - आण करणे शक्य होते. रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या या कार्टचा रुग्णांना अन्न व औषधी देण्याचे काम करताना प्रत्यक्ष वापर करता येऊ शकेल व त्यायोगे आरोग्य कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क टाळता येणे शक्य आहे. महाविद्यालयाच्या प्रा. इसाक शिकलगार आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील अंतिम वर्षाचा विद्यार्थी प्रतीक महाडिक यांनी ही कार्ट तयार केली आहे.संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष नेहा माने यांच्या हस्ते संगमेश्वर तहसीलदार सुहास थोरात यांच्याकडे हे यंत्र देण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी आर. एम. दारोकार, पोलीस निरीक्षक निशा जाधव, प्रद्युम्न माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, पद्मनाभ शेलार उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी