शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय नाही

By admin | Updated: May 11, 2016 00:09 IST

रवींद्र वायकर : तब्बल ७६ कोटींचा निधी खर्च करूनही पिंपळवाडी धरण कोरडेच

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व धरणांचा अभ्यास करून त्यांच्या आवश्यक दुरूस्तीची माहिती घेण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शासनाला आराखडा सादर करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. पिंंपळवाडी धरणासाठी ७६ कोटींचा निधी खर्च होऊनही पाण्याची उपलब्धता होऊ शकलेली नाही. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.खेड तालुक्यातील खोपी गावातील पिंपळवाडी धरणाची पाहणी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खेडचे उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड यांच्यासह परिसरातील अन्य नागरिक उपस्थित होते.यावेळी रवींद्र वायकर म्हणाले की, जिल्ह्यात असणाऱ्या धरणांतील पाण्याचा उपयोग नागरिकांना पिण्यासाठी व सिंचनासाठी होणे आवश्यक आहे. आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. याकरिता धरणांना भेटी देऊन पर्यटन विकास आराखड्याच्या धर्तीवर आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच पिंंपळवाडी धरणाचे पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी उपलब्ध होण्याकरिता आवश्यक दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. त्यासाठी शासनाकडे पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी पालकमंत्र्यांनी धरणाची पाहणी करून माहिती घेतली. या माहितीमध्ये धरणाच्या कामात कुचराई झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कुंभाड येथील शिवस्मारकाला पालकमंत्र्यांनी अभिवादन केले. येथील परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित कसा करता येईल, याचीही त्यांनी पाहणी केली.खोपी येथील छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खेडचे उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड, विजयराव भोसले, अनंतराव भोसले, केशवराव भोसले, खोपीच्या सरपंच प्रणाली भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)