शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :जिल्हा पातळीवर कोरोना तपासणी लॅब का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 16:49 IST

मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना किमान जिल्हा पातळीवर कोरोना तपासणी लॅब का नाही? असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित करून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.

ठळक मुद्देजिल्हा पातळीवर कोरोना तपासणी लॅब का नाही?, उच्च न्यायालयाचा सवाल रत्नागिरीतून दाखल झालेल्या याचिकेची व्याप्ती वाढली

रत्नागिरी : मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना किमान जिल्हा पातळीवर कोरोना तपासणी लॅब का नाही? असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित करून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.

माणसांच्या स्थलांतरामुळे कोकणात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असताना रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे निदान करणारी लॅब उभारण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेची मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली.ही याचिका रत्नागिरी जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता तिची व्याप्ती ही राज्यस्तरीय केली. मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांमध्ये कोरोना टेस्ट लॅब उघडून चालणार नाही, तर जिल्हापातळीवरही अशा लॅबची गरज आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यामध्ये कोरोना तपासणीची स्थिती काय आहे, या संदर्भात शुक्रवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर केल्याने कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांचे निदान करण्यासाठी कोरोना स्वॅब तपासणी लॅब नाही. त्यामुळे जिल्ह्यात लवकर कोरोना लॅब सुरू करण्याची मागणी करणारी जनहित याचिका रत्नागिरीतील स्थानिक मच्छीमार खलील अहमद हसनमियाँ वस्ता यांच्यावतीने अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली.त्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि के. के. तातेड यांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी बाजू मांडली. सरकारतर्फे डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे अटींची पूर्तता करीत नसल्याबद्दल कळवले आहे. याबाबत न्यायालयाने उद्विग्नता व्यक्त केली.अहवाल सादर कराही याचिका फक्त कोकणातील जिल्हा पुरती मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तपासणी केंद्रांची काय अवस्था आहे याचा अहवाल शुक्रवारपर्यंत सादर करायचे आदेश दिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी