शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown :२० दिवसात रेल्वेने ६८,७५९ कामगार त्यांच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 17:25 IST

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करून महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या कोकण रेल्वेने गेल्या २० दिवसात ५१ श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून तब्बल ६८,७५९ कामगारांना देशाच्या विविध भागात पोहोचवले आहे . या वीस दिवसात महाराष्ट्रातून १३ ट्रेनच्या माध्यमातून १५,६७७ कामगार आणि कुटुंबियांना विविध राज्यात पोहोचवण्याचे काम कोकण रेल्वेने केले आहे.

ठळक मुद्दे२० दिवसात रेल्वेने ६८,७५९ कामगार त्यांच्या घरी कोकण रेल्वेची कौतुकास्पद कामगिरी

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करून महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या कोकण रेल्वेने गेल्या २० दिवसात ५१ श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून तब्बल ६८,७५९ कामगारांना देशाच्या विविध भागात पोहोचवले आहे . या वीस दिवसात महाराष्ट्रातून १३ ट्रेनच्या माध्यमातून १५,६७७ कामगार आणि कुटुंबियांना विविध राज्यात पोहोचवण्याचे काम कोकण रेल्वेने केले आहे.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात लॉकडाऊन पासून विविध राज्याचे हजारो कामगार आपल्या राज्यात परतण्यासाठी इच्छूक होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातून उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यातील श्रमिकांकरिता खास गाड्या सोडण्यात आल्या.

महाराष्ट्रातून सोडण्यात आलेल्या या १३ श्रमिक स्पेशल ट्रेनमधून १५,६७७ श्रमिक आणि त्याचे कुटुंबीय रवाना झाले. रत्नागिरी - सिंधुदुर्गातून उत्तरप्रदेशला तीन ट्रेनमधून ४,०१६, बिहारला दोन ट्रेनच्या माध्यमातून २,६४३, कर्नाटकमध्ये तीन ट्रेनच्या माध्यमातून ३,६८०, झारखंड येथे तीन ट्रेनच्या माध्यमातून ३,५०१, मध्यप्रदेशला एक ट्रेनच्या माध्यमातून १,१६४ तर राजस्थानला एका ट्रेनच्या माध्यमातून ६७३ कामगार रवाना झाले .गोवा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातूनही कोकणरेल्वेच्या माध्यमातून श्रमिक आणि त्यांच्या कुटुंबियांना देशाच्या विविध भागात पोहोचवण्यात आले. गोव्यातून ३६ ट्रेन यच्या माध्यमातून ५०,५१८ श्रमिक त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचले. तर कर्नाटकमधून दोन ट्रेनच्या माध्यमातून २,५६४ कामगार आणि कुटुंबियांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले.कोकणरेल्वेच्या मार्गावर श्रमिकांची ही वाहतूक अजूनही सुरु आहे. पुढील काही दिवसात मागणीनुसार श्रमिकांना त्यांच्या घरी त्यांच्या राज्यात पोहोचवण्यकरिता कोकण रेल्वे ट्रेनची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. गेल्या वीस दिवसात या हजारो कामगारांच्या कुटुंबियांना सुरक्षितपणे पोहोचवण्याकरिता कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांपासून कामगारांपर्यंत सगळ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि महसूल पोलीस आणि एसटी विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने हजारो कामगार त्यांच्या सामानासह जाताना करण्यात आलेल्या अचूक नियोजनामुळे कोणत्याही गोंधळाशिवाय ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात कोकण रेल्वेला यश आलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे