शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

CoronaVirus Lockdown : कोरोनाच्या संकटकाळात वाहतोय माणुसकीचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 16:01 IST

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माणसा माणसांमधील हेवेदावे संपुष्टात येत आहेत. या संकटाचा एकजूटीने मुकाबला करण्यासाठी शासन, प्रशासन सज्ज झालेले असतानाच प्रत्येकजण या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता प्रयत्न करीत आहेत. कोरोनामुळे देशातील सर्वसामान्य नागरिक, मजूर, गोरगरीब लोक अधिक संकटात सापडले आहेत. हातावर पोट असलेल्या या नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून माणूसकीचा झरा आता वाहू लागला असून अनेकजणया लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सामाजिक संघटना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भुकेल्या लोकांना मदतीचा हात आर्थिक किवा अन्नधान्याच्या स्वरुपात दिला जात आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या संकटकाळात वाहतोय माणुसकीचा झराअनेकांकडून स्वयंस्फुर्तीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

रत्नागिरी : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माणसा माणसांमधील हेवेदावे संपुष्टात येत आहेत. या संकटाचा एकजूटीने मुकाबला करण्यासाठी शासन, प्रशासन सज्ज झालेले असतानाच प्रत्येकजण या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता प्रयत्न करीत आहेत. कोरोनामुळे देशातील सर्वसामान्य नागरिक, मजूर, गोरगरीब लोक अधिक संकटात सापडले आहेत. हातावर पोट असलेल्या या नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून माणूसकीचा झरा आता वाहू लागला असून अनेकजणया लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सामाजिक संघटना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भुकेल्या लोकांना मदतीचा हात आर्थिक किवा अन्नधान्याच्या स्वरुपात दिला जात आहे.रत्नागिरी शहरात अनेकसामाजिक ग्रुप, शिवसेना, भाजप, कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस आणि काहीजण स्वतंत्रपणे अशा गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदतीचा हात देत आहेत. शहरातील भारतीय जनता पाटीर्चे प्रभाग क्रमांक १०चे नगरसेवक समीर तिवरेकर यांनी कोरोनामुळे जनतेवर आलेल्या संकटातून धीर देण्यासाठी ढवळेवाडी, कळंबटेवाडी, खालचीआळी येथे १२० कुटुंबियांना अन्नधान्य वाटप केले. यावेळी नगरसेवक समीर तिवरेकर, नगरसेविका सुप्रिया रसाळ, भाजपा युवामोर्चा माजी अध्यक्ष मंदार मयेकर, शहर सरचिटणीस बाबू सुर्वे, संदीप रसाळ, प्रसाद फडके, रामजी भानुशाली, शिवाजी आंग्रे उपस्थित होते.रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनीही शहरातील तसेच तालुक्यातील अनेक गरजू लोकांना अन्नधान्याच्या रुपाने मदतीचा हात पुढे केला आाहे. अनेक गरीब कुटुंबे, मजूरांना त्यांनी अन्नधान्याच्या रुपात मदत केली आहे. रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी प्रभाग क्रमांक १ मध्ये परटवणे येथे बोरकरवाडीमध्ये ३० कुटुंबे व सरोदेवाडीतील ४८ कुटुंबांना धान्य, डाळी व जीवनावश्यक वस्तूंंचे वाटप केले आहे. शहरातील सर्वच प्रभागांमध्ये फाळके यांच्यातर्फे मोफत पाणी पुरवठाही केला जात आहे.रत्नागिरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेतर्फे कोरोना संकटग्रस्तांना मदत देऊन दिलासा दिला आहे. हातावर पोट असलेल्या कुटुंबांची ओढाताण लक्षात घेऊन पतसंस्थेने तत्काळ भेट म्हणून स्वरुप भेट या नावाने ह्यकिराणा पॅकेजह्ण वितरीत केले जात आहे. शहरातील सर्वच प्रभागांमध्ये हे वितरण केले जात आहे. सहकार चळवळीला अपेक्षित असे हे काम पतसंस्थेकडून सुरू असल्याचे अ‍ॅड. पटवर्धन यांनी म्हटले आहे.गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून राज्य सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीचाही लाभ अनेकांना मिळत आहे. रत्नागिरी शहरातील गणेश धुरी चालवित असलेल्या शिवभोजन केंद्रातून आता शिवभोजन थाळी गरजू लोकांच्या घरी पोहोच केली जात आहे. तसेच अनेक सामाजिक संघटना, व्यक्तीकडूनही गरजुंंना अन्न-धान्याचा पुरवठा केला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी