शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-कोरोनामुळे गणपतीपुळे परिसरात शुकशुकाट, कर्मचाऱ्यांसाठी मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 17:26 IST

कोरोना विषाणूचा पर्यटनाला फटका बसला आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटक व भाविकांची संख्याही यामुळे रोडावली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी या ठिकाणी विशेष दक्षता घेतली जात आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे गणपतीपुळे परिसरात शुकशुकाट, कर्मचाऱ्यांसाठी मास्कभाविक - पर्यटकांसाठी सॅनिटायझरची सोय, एमटीडीसीचे बुकिंग रद्द

गणपतीपुळे : कोरोना विषाणूचा पर्यटनाला फटका बसला आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटक व भाविकांची संख्याही यामुळे रोडावली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी या ठिकाणी विशेष दक्षता घेतली जात आहे.याठिकाणी मंदिर परिसरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर व्यवस्थापन समितीने बैठक घेऊन कोरोनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देवस्थानचे सरपंच डॉ. विवेक भिडे यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, मंदिर बंद करण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. तसेच त्याबाबत आपल्याला राज्य शासनाकडूनही कुठल्याही प्रकारचे निर्देश आलेले नाहीत.मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, मंदिर परिसरात येणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझरची सोय उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच देवस्थानमधील कर्मचाऱ्यांनाही मास्क लावूनच पर्यटकांच्या सेवेसाठी कार्यरत ठेवण्यात येणार आहे.

कोरोनामुळे खासगी हॉटेल्स व लॉजिंगमधून पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. तर गणपतीपुळे येथील एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये पर्यटकांनी केलेली आरक्षणे रद्द केली आहेत. पर्यटकांची संख्या रोडावल्याने पर्यटन महामंडळाला फटका बसला आहे.मंदिर बंदची अफवागणपतीपुळे परिसरात कोरोनाच्या भीतीने पर्यटन व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले स्वयंभू गणेश मंदिर भाविक - पर्यटकांसाठी बंद होणार, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. परंतु, याबाबत मंदिर व्यवस्थापन समितीकडून तातडीची बैठक घेण्यात येऊन मंदिर बंद ठेवणार नसल्याचे जाहीर केले. मंदिर बंद होण्याबाबतची ती अफवा असल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाGanpatipule Mandirगणपतीपुळे मंदिरRatnagiriरत्नागिरी