शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू रत्नागिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 17:01 IST

corona virus Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. सध्या ही संख्या कमी झाली असली तरी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचे कमी झालेले प्रमाण जानेवारी महिन्यात वाढले असून कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही या महिन्यात वाढली आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूमध्ये सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले असून आतापर्यंत मृत्यूची संख्या रत्नागिरी तालुक्यात अधिक आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू रत्नागिरीतसर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात

शोभना कांबळेरत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. सध्या ही संख्या कमी झाली असली तरी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचे कमी झालेले प्रमाण जानेवारी महिन्यात वाढले असून कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही या महिन्यात वाढली आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूमध्ये सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले असून आतापर्यंत मृत्यूची संख्या रत्नागिरी तालुक्यात अधिक आहे.एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ५ असलेली संख्या मे महिन्यात २८१ वर पोहोचली. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. गणेशोत्सवाच्या कालावधीत लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात मुंबईकर गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात परतले. त्यामुळे केवळ ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्या १७७३ झाली, तर कोरोनाने ७४ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात कोरोनाने उच्चांक गाठला. या महिन्यातच केवळ रुग्ण संख्या ३९४५ झाली तर मृत्यू झालेल्यांची संख्या १३० वर पोहोचली.२६ सप्टेंबरअखेर कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागली. त्याबरोबर मृत्यूचेही प्रमाण घटले. जानेवारपासून पुन्हा रुग्णसंख्या आणि मृत्यूची संख्या वाढू लागल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.पुरूषांचे मृत्यू जास्तजिल्ह्यात ९ फेब्रुवारी अखेर कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ३५२ झाली आहे. यात पुरूषांची संख्या २६१, तर महिलांची संख्या ९१ आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक १३० बळी गेले. त्याचबरोबर या महिन्यात रूग्णसंख्याही भरमसाठ वाढली. मात्र, २६ सप्टेंबरपासून रूग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली. ऑक्टोबर महिन्यातील रूग्णसंख्या ८४६ वर आली, तर मृत्यू संख्या ५२ होती. मात्र नोव्हेंबर डिसेंबर हे दोन महिने कोरोना रूग्ण आणि मृत्यूच्या बाबतीत दिलासा देणारे ठरले.० ते १५ वयोगटाची कोरोनावर यशस्वी मातआतापर्यंत ० ते १५ वयोगटातील रूग्णांनी मृत्यूवर यशस्वी मात केली आहे. तसेच सुमारे ४२ बालके कोरोनामुक्त झाली आहेत. यात ऑगस्ट महिन्यात कोरोनाने निधन झालेले बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे यांचे योगदान महत्वपूर्ण होते. जानेवारी महिन्यात मात्र, १६ वर्षीय मुलाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने ० ते २० वयोगटात एका मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत ६१ ते ८० वयोगटातील कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक १७९ आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी