शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्णांना कोरोनाचा फटका, औषधे न मिळाल्याने बळावला आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:18 IST

mental hospital Ratnagiri-रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या मनोरुग्णांना कोरोनाच्या काळात वेळेवर औषधे न मिळाल्याने त्यांचा आजार बळावला. त्यामुळे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात कोरोनाच्या काळात असलेल्या रुग्णांमध्ये लॉकडाऊन शिथील होताच जवळजवळ दुपटीने वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे मनोरुग्णांना कोरोनाचा फटका रूग्णांची औषधे न मिळाल्याने बळावला आजार

शोभना कांबळेरत्नागिरी : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या मनोरुग्णांना कोरोनाच्या काळात वेळेवर औषधे न मिळाल्याने त्यांचा आजार बळावला. त्यामुळे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात कोरोनाच्या काळात असलेल्या रुग्णांमध्ये लॉकडाऊन शिथील होताच जवळजवळ दुपटीने वाढ झाली आहे.येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून मनोरुग्ण उपचारासाठी येत असतात. कोरोनाच्या अनुषंगाने २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊनला सुरुवात झाली. त्यामुळे सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील केल्याने वाहतूक थांबली.

जे मनोरुग्ण रुग्णालयात भरती केलेले होते, त्यांची औषधे नियमित सुरू राहिली. मात्र, या पाच जिल्ह्यांत बरे होऊन परतलेल्या रुग्णांना त्यांच्या जिल्ह्यात ही औषधे उपलब्ध नसल्याने नियमित औषधांसाठी रत्नागिरीला येणे क्रमप्राप्त होते. मात्र, कोरोना काळात या रुग्णांना रत्नागिरीत आणणे त्यांच्या नातेवाईकांना शक्य झाले नाही; त्यामुळे बरे झालेल्या मनोरुग्णांच्या आजारात पुन्हा वाढ झाली.

 

येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील मनोरुग्ण रत्नागिरीत उपचारासाठी येतात. बरे होऊन जाणाऱ्यांनाही नियमित औषधे घ्यावी लागतात. ती औषधे येथील मनोरुग्णालयात मिळतात. मात्र, कोरोनाच्या काळात सर्वच बंद असल्याने या रुग्णांना औषधे वेळेवर मिळाली नाहीत; त्यामुळे त्यांच्या आजारात वाढ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले.- डॉ. संजय कलकुटगी,प्रशासकीय अधिकारी

या आजारांच्या रूग्णांमध्ये झाली वाढया पाच जिल्ह्यांमध्ये उपचार सुरू असलेले सुमारे २,१८६ मनोरुग्ण आहेत. यापैकी काही रुग्ण बरे झालेले असले तरी त्यांची औषधे नियमित द्यावी लागतात. ही औषधे रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून न्यावी लागतात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात त्यांना ही औषधे मिळू शकली नाहीत. त्यामुळे काल्पनिक भयंगड (एन्झायटी), नैराश्य (डिप्रेशन), सिझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) हे रुग्ण वाढले.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयRatnagiriरत्नागिरी