शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

फ्रंट लाईनवरील कोरोना योद्धे लस घेण्याबाबत बॅक फूटवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 14:15 IST

Corona vaccine Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यातील १३ केंद्रांवर पहिल्या फळीतील कोरोना योध्द्यांसाठी लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, या लसीकरणासाठी मिळणारा प्रतिसाद कमी असल्याने या कोरोना योध्द्यांना लसीकरणाची भीती वाटत आहे, की त्यांना लसीकरणाची गरज वाटत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.

ठळक मुद्दे फ्रंट लाईनवरील कोरोना योद्धे लस घेण्याबाबत बॅक फूटवरकोरोना लसीकरणाबाबत अजूनही अनेकांच्या मनात भीती कायम

रत्नागिरी : जिल्ह्यातील १३ केंद्रांवर पहिल्या फळीतील कोरोना योध्द्यांसाठी लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, या लसीकरणासाठी मिळणारा प्रतिसाद कमी असल्याने या कोरोना योध्द्यांना लसीकरणाची भीती वाटत आहे, की त्यांना लसीकरणाची गरज वाटत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.यादीत नाव असलेल्या १५,७७३ आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ९४२२ जणांनी लस घेतली आहे. तसेच पहिल्या फळीतील महसूल, पोलीस या कर्मचाऱ्यांपैकी २३ टक्के कर्मचारीच लसीकरणासाठी पुढे आले आहेत. पहिल्या फळीतील यादीमध्ये नावे असलेल्या ४४६८ जणांपैकी ९८७ जणांनीच आतापर्यंत लस घेतली आहे. त्यामुळे फ्रंट लाईनवरील योद्धे लसीकरणात मात्र, मागे राहत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील १५ हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी आली असून त्यांना लस दिली जात आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सई धुरी, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. शुभांगी बेडेकर, भूलतज्ज्ञ मंगला चव्हाण यांनी लस घेऊन याचा शुभारंभ केला होता.

त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्यानंतरही जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी स्वत: लस घेऊन आरोग्य, महसूल तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनाही लस घेण्याचे आवाहन केले होते.शासनाने पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील शासकीय, खासगी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय तसेच आरोग्य सेवक - सेविका यांना लस देण्यास सुरुवात केली आहे. ज्यांचे पहिल्या टप्प्यातील डोस पूर्ण होऊन २८ दिवस झाले आहेत, त्यांना आता दुसरा डोस दिला जात आहे. यासाठी शासनाकडून दुसऱ्या टप्प्यात कोविशिल्डचे आणखी दहा हजार डोस जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. लसीचा किरकोळ स्वरूपात त्रास होत असला तरी, त्याचे कुठलेही दुष्परिणाम अजूनही समोर आलेले नाहीत.सध्या आरोग्य यंत्रणेतील व्यक्तींना लस देण्याबरोबरच फ्रंट लाईनवर कोरोनाशी लढा देणाऱ्या जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांपैकी लसीकरणासाठी १०२० जणांची यादी शासनाकडून आली आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांपैकी १७१७ जणांची यादीही प्राप्त झाली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांकडूनही लसीकरणाला प्रतिसाद कमी मिळत आहे.तेरा ठिकाणी होत आहे लसीकरणजिल्ह्यात सध्या जिल्हा शासकीय रुग्णालय, दापोली, कळंबणी, कामथे ही तीन उपजिल्हा रुग्णालये तसेच मंडणगड, लांजा, संगमेश्वर, गुहागर, राजापूर ही ग्रामीण रुग्णालये, तसेच वालावलकर रुग्णालय, साखरपा उपकेंद्र तसेच रत्नागिरी शहरातील कोकण नगर आणि झाडगाव ही दोन नागरी आरोग्य केंद्रे या १३ ठिकाणी लसीकरण केले जात आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसRatnagiriरत्नागिरी