शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : वरवली ठरतेय कोरोनाचा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 12:12 IST

corona virus Khed Ratnagiri- खेडमध्ये रविवारी आणखी सहा कोरोना बाधितांची भर पडली असून, आता तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ७६ वर गेली आहे. खेड तालुका जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे.

ठळक मुद्देवरवली ठरतेय कोरोनाचा हॉटस्पॉटआणखी सहा कोरोना बाधितांची भर

खेड : खेडमध्ये रविवारी आणखी सहा कोरोना बाधितांची भर पडली असून, आता तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ७६ वर गेली आहे. खेड तालुका जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे.

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा लवेल येथील घरडा इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली आरोग्य विभागामार्फत सुरू झाल्या आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेळके यांनी दिली आहे.आंबवली आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या वरवली या एका गावात ५५ रुग्ण, तर आंबवली गावात दोन, किंजळे गावात दोन अशा प्रकारे ५९ रुग्ण आहेत. वरवली हे अख्खे गाव कंटेन्टमेंट झोन असून, इतर नऊ ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. खेडमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ५५७ वर गेला असून, आतापर्यंत ७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ३० खाटांचे आयसोलेशन वॉर्ड आहे, तर खेड नगरपालिका दवाखान्यातील कोविड सेंटरमध्ये केवळ १० बेडची व्यवस्था आहे. तालुक्यात एकूण ७६ रुग्ण कोरोनाचे असल्याने उर्वरित रुग्णांना कामथे, रत्नागिरी येथे हलविण्यात येत आहे. दिवसाला कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत होणारी वाढ लक्षात घेता आता पुन्हा एकदा लवेल येथील घरडा इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहामध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करण्याबाबत आरोग्य विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या इमारतीची पाहणी केली. कोविड सेंटर सुरू करण्याबाबतची आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा कोरोना केअर सेंटर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKhedखेडRatnagiriरत्नागिरी