शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : दापोलीत अँटिजेन टेस्टला आरोग्य केंद्रांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 14:26 IST

corona virus, Health centers, antigen test, ratnagirinews कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दापोली तालुक्यातील तब्बल ७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी या टेस्टला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शासनाकडून आलेले हजारो कीट प्राथमिक आरोग्य केंद्रात धूळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देदापोलीत अँटिजेन टेस्टला आरोग्य केंद्रांचा विरोधहजारो कीट प्राथमिक आरोग्य केंद्रात धूळखात पडून

शिवाजी गोरे दापोली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दापोली तालुक्यातील तब्बल ७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी या टेस्टला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शासनाकडून आलेले हजारो कीट प्राथमिक आरोग्य केंद्रात धूळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.दापोली तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी केवळ एकाच आरोग्य केंद्रात अँटिजेन टेस्ट केली जात आहे. उर्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी या टेस्टला विरोध दर्शवला आहे. तालुक्यातील उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अँटिजेन टेस्ट केली जात आहे.तालुक्यातील पिसई, साखळोली, फणसू, दाभोळ, आसूद - आंबवली, आंजर्ले, केळशी या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांची अँटिजेन टेस्ट करण्याला कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे रुग्णांना टेस्ट करण्यासाठी दापोलीत यावे लागत आहे.तालुक्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी टेक्निशियनच्या माध्यमातून या टेस्ट व्हाव्यात, ते आमचे काम नाही, असे कारण दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कर्मचाऱ्यांना अँटिजेन टेस्ट कशी घ्यायची, यासंदर्भात यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे. अँटिजेन टेस्ट घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसे कर्मचारीही उपलब्ध असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.याआधी शासनाकडून अँटिजेन कीट उपलब्ध होत नसल्याची ओरड केली जात होती. आता शासनाकडून कीट उपलब्ध करण्यात आली असून, तपासणीच होत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरवण्यात आलेले सुमारे हजारो कीट धूळखात पडून आहेत.

याकडे आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी अँटिजेन टेस्ट करण्याच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. यावर वरिष्ठ अधिकारी कोणता तोडगा काढतात, हेच पाहायचे आहे.

''दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी कोविडच्या कामामध्ये हलगर्जीपणा करत असतील तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी. तसेच सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटिजेन टेस्टच्या कीट उपलब्ध आहेत. परंतु आठपैकी सात प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी या टेस्ट करण्याला विरोध करत असल्याचे समोर येत आहे. या कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी आपण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार आहोत.''- योगेश कदम,आमदार, दापोली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी