शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : लोकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 16:24 IST

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी दरदिवशी होणाऱ्या स्वॅब आणि रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर मृत्यूचा दरही वाढतो आहे. सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आहे. मात्र, नागरिकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढला आहे.

ठळक मुद्देलोकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी दरदिवशी होणाऱ्या स्वॅब आणि रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर मृत्यूचा दरही वाढतो आहे. सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आहे. मात्र, नागरिकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढला आहे.४ मे रोजी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काहीअंशी शिथिलता आल्याने मुंबईकर मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात दाखल झाले आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दोन आकडी असलेली संख्या मे अखेर तीन आकडी होत चौपट झाली. त्यानंतर मेअखेरीस २५० असलेली संख्या जूनअखेर ६०० झाली. त्यानंतरही संख्येत लक्षणीय वाढ होत गेली. गेल्या साडेतीन महिन्यात ही संख्या दहापट म्हणजेच ६,८०० पेक्षा अधिक वाढली आहे. मृतांचा आकडाही आता २२५ वर जाऊन पोहोचला आहे.आॅगस्ट महिन्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांमुळे रत्नागिरीतील रुग्णसंख्या वाढणार, हा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. आॅगस्ट महिन्यात प्रादुर्भाव वाढल्याने कोरोनाचा विस्फोट झाला. त्यानंतर ही संख्या अधिकच वाढू लागली आहे. सध्या कोरोनाचा समूह संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा वारंवार कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करण्यासाठी सातत्याने आवाहन करीत आहेत. मात्र, नागरिक बेजबाबदारपणे हे नियम टाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता कोरोना संसर्गाचे प्रमाणही वाढू लागले आहे. दिवसाला पॉझिटिव्ह येणाऱ्या अहवालाची संख्या वाढली आहे.कोरोना योद्धेही मोठ्या प्रमाणावर बाधित होऊ लागले आहेत. त्यामुळे आधीच अपुऱ्या असलेल्या आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेऊन नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन शारीरिक अंतर ठेवणे, त्याचबरोबर मास्क वापरणे, सॅनिटाइझ करणे किंवा साबणाने होत धुण्याची सवय नियमित करायला हवी.

जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग वाढू लागला असला तरी नागरिक शारीरिक अंतराची तमा न बाळगता विनामास्क बाहेर भटकत आहेत. त्यामुळे समूह संसर्गाचे प्रमाण रोखणे आता आरोग्य यंत्रणेसमोर खरोखरच मोठे आव्हान ठरत आहे.खरेदीला गर्दीआता सर्वत्र अनलॉक प्रक्रिया सुरू आहे. सर्वच बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे लोकांच्या स्वैर वागण्यात अधिकच भर पडली आहे. दुकाने सुरू झाल्याने लोक खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत. यातूनच व्यापारी आणि नागरिक बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही नागरिक कोरोना कायमचा गायब झाला, अशी बेफिकीरी दाखवत आहेत. सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करीत आहेत.मृत्यूदर वाढतोयजिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २२ सप्टेंबरअखेर ५०८० (७४.३५ टक्के) आहे. रुग्ण संख्येत एकूण लोकसंख्येच्या ०.३ टक्के वाढ झाली आहे, तर मृत्यू दर २.९ टक्क्यांवरून पुन्हा ३.२९ टक्के एवढा वाढला आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारी आता ६७ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांपर्यंत पोहोचली असली तरी मृत्यूची वाढती टक्केवारीही चिंताजनक आहे.

लोकांमध्ये कोरोनाबाबतची जागरूकता नाही. त्यामुळे अजूनही शारीरिक अंतर राखणे, मास्क लावणे, यांचे पालन केले जात नाही. त्यामुळेच समूह संसर्ग वाढू लागला आहे. त्याचबरोबर गंभीर आजार किंवा गंभीर शस्त्रक्रिया झालेले रुग्ण यांनीही भीती न बाळगता खबरदारी घ्यायला हवी. पण आपल्याकडे अंगावर आजार काढणे, ही मानसिकता असल्याने चाचणी वेळेवर होत नाही. लोक दुसरा कुठला आजार वाढला, तरच तपासणी करण्यासाठी येतात. मात्र, कोरोना केवळ हृदय आणि फुफ्फुसावर परिणाम करत नाही तर इतर गंभीर आजारावरही करतो, हे न लक्षात घेतल्याने आजार वाढतो आणि मृत्यूदरही वाढ जातो.- डॉ. अलिमियॉ परकार,रत्नागिरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी