रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याचे प्रमाण सुरुच आहे. जिल्हा रुग्णालयातून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ७८१ पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये एका ११ वर्षाच्या मुलाचाही समावेश असून, जिल्हा रूग्णालयातील आणखी एक कर्मचारी कोरोनाबाधित झाला आहे. तर राजापुरातील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात स्थानिक पातळीवर कोरोनाचे संक्रमण वेगाने होऊ लागले आहे. स्थानिक नागरिकांना कोरोनाची लागण होऊ लागल्याने सर्वांसाठीच ही चिंतेची बाब बनली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्यात १ तारखेपासून लॉकडाऊनही जाहीर करण्यात आले आहे. तरीही कोरोना संक्रमणाचा धोका टळलेला नाही. मंगळवारी सकाळी आलेल्या अहवालांमध्ये आणखी ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील १२, चिपळूण तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील ६ आणि दापोलीतील १३ रुग्णांचा समावेश आहे.रत्नागिरी तालुक्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये राजीवडा, कुवारबाव, संभाजीनगर - नाचणे, नवानगर, सन्मित्रनगर या भागातील रुग्णांचा समावेश आहे. कारागृहातील कोरोनाची लागण झालेल्या पोलिसाच्या मुलालाही कोरोनाची लागणच झाली आहे.त्याचबरोबर राजापूर शहरातील साखळकरवाडीतील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कातील ५२ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला असून, १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे राजापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर तालुक्यातील कुवेशी आणि पारवाडी येथील रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, कोदवली येथील रुग्णाच्या संपर्कातील त्याची पत्नी व मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे समोर आले आहे.
corona virus : रत्नागिरीत ११ वर्षाच्या मुलाला कोरोना,आणखी ३१ अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 13:56 IST
रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याचे प्रमाण सुरुच आहे. जिल्हा रुग्णालयातून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ३१ जणांचे अहवाल ...
corona virus : रत्नागिरीत ११ वर्षाच्या मुलाला कोरोना,आणखी ३१ अहवाल पॉझिटिव्ह
ठळक मुद्देरत्नागिरीत ११ वर्षाच्या मुलाला कोरोना,आणखी ३१ अहवाल पॉझिटिव्हकोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ, राजापुरातील महिलेच्या संपर्कातील १८ जण निगेटिव्ह