शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

corona virus : चिपळुणातील ४८ गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 15:18 IST

corona virus, ratnagirinews, कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने जेवढे प्रयत्न केले, तेवढाच प्रयत्न त्या-त्या गावच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थांनीही केले. त्यामुळे तालुक्यातील १६५पैकी ११७ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी अजूनही ४८ गावांनी कोरोनाला गावात प्रवेश दिलेला नाही. यामध्ये विशेषत: रामपूर व वहाळ हद्दीतील गावांना मोठे यश आले आहे.

ठळक मुद्देचिपळुणातील ४८ गावांनी कोरोनाला वेशीवर रोखलेरामपूर व वहाळ हद्दीतील गावांना मोठे यश

संदीप बांद्रे चिपळूण : कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने जेवढे प्रयत्न केले, तेवढाच प्रयत्न त्या-त्या गावच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थांनीही केले. त्यामुळे तालुक्यातील १६५पैकी ११७ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी अजूनही ४८ गावांनी कोरोनाला गावात प्रवेश दिलेला नाही. यामध्ये विशेषत: रामपूर व वहाळ हद्दीतील गावांना मोठे यश आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लागू झालेल्या संचारबंदीनंतर आजतागायत प्रशासन ही लढाई जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांना हळूहळू यश येत आहे. तूर्तास तालुक्यात २,२३५ इतके कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यामध्ये शहरी भागात ८९६, तर ग्रामीण भागात १,३३९ इतके रुग्ण आहेत.

ग्रामीण भागातील रुग्ण संख्या अजूनही नियंत्रणात आहे. यामध्ये तालुक्यातील रामपूर, अडरे, कापरे, दादर, खरवते, वहाळ, सावर्डे, फुरुस, शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील ४८ गावांनी कोरोनाला गावच्या वेशीवरच रोखले आहे. यामध्ये रामपूर हद्दीतील १०, वहाळ हद्दीतील ११, तर खरवते हद्दीतील ७ गावांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही.रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २६ गावे असून, त्यातील १७ गावांमध्ये रुग्ण आढळले. परंतु मजरेकौंढर, शिरवली, डुगवे, कळमुंडी, बोरगाव, चिवेली, उभळे, आंबेरे आदी १०गावांमध्ये, तर वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १९ गावांपैकी ८ गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत. मात्र, सर्वात जास्त ११ गावांचा अहवाल निरंक आहे.

यामध्ये केरे, कातळवाडी, पातेपिलवली, ढाकमोली, खांडोत्री, पिलवली, तोंडली, वारेली, देवपाठ, वडेरू आदी गावांचा समावेश आहे. तसेच अडरे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील १७ गावांपैकी १५ गावांमध्ये रुग्ण आढळले असून, निरबाडे, मांडवखेरी ही दोन गावं निरंक आहेत.दादर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २० गावांपैकी १४ गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत. तर रिक्टोली, कादवड, स्वयंदेव, गणेशपूर, राधानगर, दादर गावांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १९ गावांपैकी १२ गावांमध्ये रुग्ण आढळले. ताम्हणमळा, ओमळी - पावरवाडी, खरवते, रावळगाव, रेहळे, खोपड, मजरेकाशी या गावात एकही रुग्ण आढळलेला नाही.

सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील २० गावांपैकी तब्बल १८गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत. केवळ टेरव दत्तवाडी व वेतकोंड येथे रुग्ण आढळलेला नाही. फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १७ गावांपैकी १० गावांमध्ये रुग्ण आढळले असून, हडकणी, डेरवण खुर्द, मंजुत्री, गोवळ, पाते, तळवडे, नांदगाव खुर्द या गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे. शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील ११ गावांपैकी १० गावांमध्ये रुग्ण आढळले. केवळ कोंडफणसवणे गावात रुग्ण आढळलेला नाही.बिवली व कालुस्ते गावात सुरुवातीपासूनच जनजागृती केली गेली.

ग्राम कृती दलाने वाडीनिहाय काम केले. कोणी पाहुणा गावात आला तरी त्याची चौकशी करून होमक्वारंटाईन केले जात होते. शिवाय बिवलीचे सरपंच अनंत शिंदे व कालुस्तेचे रामकृष्ण कदम यांनी व सदस्यांनी मोठी मेहनत घेतली. त्यासाठी गावातील खासगी डॉक्टरांची मदत घेतली. आयुर्वेदिक काढा व गोळ्या वाटप केले. ग्रामस्थांनी सर्व नियमांचे पालन केले.- पराग बांद्रे, बिवली, ग्रामसेवक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी