रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजीक साखरतर येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. साखरतरमधील महिलेच्या चौदा नातेवाईकांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी एका महिलेचा अहवाल कोरोनाबाधित असल्याचा समोर आले आहे. यामुळे रत्नागिरीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे.खेड येथील कोरोना रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना रत्नागिरीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रत्नागिरी येथील साखरतर येथील पॉझिटिव्ह महिलेच्या नातेवाईकांपैकी एका महिलेचा रिपोर्टदेखील गुरुवारी रात्री कोरोनाबाधित म्हणून आला आहे. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यात संख्या वाढत असून, बाहेरून आलेल्या नागरिकांना स्वत:हून उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाने केले आहे.रत्नागिरीत आतापर्यंत ५ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. गुहागर येथील पॉझिटिव्ह रूग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. तर आता ३ रूग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.संबंधित महिला ४८ वर्षाची आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन विभागामध्ये उपचार सुरू आहेत.
corona in ratnagiri-रत्नागिरीत कोरोनाबाधित पाचवा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 10:37 IST
रत्नागिरी शहरानजीक साखरतर येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. साखरतरमधील महिलेच्या चौदा नातेवाईकांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी एका महिलेचा अहवाल कोरोनाबाधित असल्याचा समोर आले आहे. यामुळे रत्नागिरीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे.
corona in ratnagiri-रत्नागिरीत कोरोनाबाधित पाचवा रुग्ण
ठळक मुद्देसाखरतर येथील आणखी एका महिलेचे अहवाल पॉझिटीव्हकोरोनाबाधित महिलेच्या आली होती संपर्कात