शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

corona in ratnagiri-कोरोनातही हापूसची आखाती देशात वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 15:43 IST

कोरोनामुळे लॉकडाऊनचे संकट जगभरातील देशांवर आहे. लॉकडाऊनमुळे शेतमालासह विविध व्यवसायांना बसला असताना, पणन विभाग व कृषी विभागाच्या प्रयत्नाने हापूस निर्यातीला चालना मिळाली आहे. जलवाहतुकीव्दारे १०५ टन हापूस गेल्या आठवड्यात आखाती प्रदेशात निर्यात करण्यात आला. त्यानंतर बुधवार दिनांक ८ एप्रिल रोजी नवी मुंबईतील वाशी मार्केट येथून २८२ मेट्रिक टन हापूस संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत याठिकाणी निर्यात करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोरोनातही हापूसची आखाती देशात वारीशेतमालाला आखाती प्रदेशातून मागणी

रत्नागिरी : कोरोनामुळे लॉकडाऊनचे संकट जगभरातील देशांवर आहे. लॉकडाऊनमुळे शेतमालासह विविध व्यवसायांना बसला असताना, पणन विभाग व कृषी विभागाच्या प्रयत्नाने हापूस निर्यातीला चालना मिळाली आहे. जलवाहतुकीव्दारे १०५ टन हापूस गेल्या आठवड्यात आखाती प्रदेशात निर्यात करण्यात आला. त्यानंतर बुधवार दिनांक ८ एप्रिल रोजी नवी मुंबईतील वाशी मार्केट येथून २८२ मेट्रिक टन हापूस संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत याठिकाणी निर्यात करण्यात आला आहे.यावर्षी हापूस हंगाम नियोजित हंगामापेक्षा उशिरा सुरू झाला आहे. मात्र, आंबा हंगाम सुरू होत असतानाच कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. उष्म्यामुळे आंबा तयार होऊ लागला आहे. बहुतांश शेतकरी वाशी, नवी मुंबई येथील मार्केटमध्येच आंबा विक्रीसाठी पाठवितात. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने आंबा खरेदीसाठी ग्राहक नसल्याचे मुंबईतील व्यापारी सांगत आहेत.

शिवाय ग्राहकांअभावी दरही गडगडले आहेत. त्यावर पर्याय म्हणून पणन मंडळ, कृषी विभाग, आत्मा यासह काही खासगी व्यापाऱ्यांनी हापूसच्या विक्रीसाठी प्रयत्न सुरू केले. अन्य जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांशी चर्चा करून शेतकरी ते थेट ग्राहक अशी विक्री व्यवस्था सुरू केली आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात ४४० पेट्या सातारा जिल्ह्यात विक्रीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.मुंबई मार्केटवर भिस्त ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. यावर पर्याय म्हणून आखाती प्रदेशातील निर्यात जलवाहतुकीव्दारे सुरू करण्यात आली आहे. आखाती देशातून आंब्याला मागणी आहे. मात्र, हवाई वाहतूक बंद असल्याने समुद्रमार्गे वाहतूक करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे.

गेल्या आठवड्यात १०५ मेट्रिक टन आंबा आखाती प्रदेशात पाठविण्यात आला. बुधवारी पुन्हा २०५ मेट्रिक टन आंब्याची निर्यात वाशी मार्केटमधून बहरीन, कुवेत व संयुक्त अरब अमिरातकडे करण्यात आली आहे. निर्यात वाढली तर वाशी मार्केटमधील साठणाऱ्या आंबा पेट्यांची साठवणूक कमी होऊन दर स्थिर राहणार आहेत. सध्या ग्राहकांअभावी पेटीला पाचशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत दर देण्यात येत आहे. निर्यात वाढली तर दरही वाढण्याची शक्यता आहे. जलवाहतुकीव्दारे निर्यात होणाऱ्या मालासाठी खर्च कमी येत आहे.वाढती मागणीशेतमालाला आखाती प्रदेशातून मागणी वाढत आहे. बुधवारी २८६४ शेतमालाची निर्यात करण्यात आली आहे. त्यामध्ये १५०० मेट्रिक टन कांदा, २८२ मेट्रिक टन आंबा, ६०० मेट्रिक टन भाजीपाला, ४८२ मेट्रिक टन द्राक्ष, ८५५ मेट्रिक टन केळी निर्यात करण्यात आली. कांदा, भाजीपाला, द्राक्ष, केळ्यांसह आंबा निर्यात करण्यात आला आहे. आंब्याची निर्यात वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMangoआंबाRatnagiriरत्नागिरी