शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ आता सारीचे संकट, एकूण ११६ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 14:42 IST

कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच जिल्ह्यात सारी या साथीच्या आजारानेही धुमाकूळ घातला आहे. मागील तीन महिन्यात जिल्ह्यात सारीचे ११६ रुग्ण आढळून आले असून, १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे सारी आजाराने जिल्हावासियांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे़.

ठळक मुद्देकोरोनापाठोपाठ आता सारीचे संकटजिल्ह्यात एकूण ११६ रूग्ण, आतापर्यंत १३ रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी : कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच जिल्ह्यात सारी या साथीच्या आजारानेही धुमाकूळ घातला आहे. मागील तीन महिन्यात जिल्ह्यात सारीचे ११६ रुग्ण आढळून आले असून, १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे सारी आजाराने जिल्हावासियांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे़.सारीच्या तापामध्ये अनेक आजारांचा समावेश असून, हा समूहरोग म्हणून गणला जातो़ सारी आणि कोरोना हे दोन वेगवेगळे आजार असले तरी या दोन्ही आजारांची प्राथमिक लक्षणे सारखीच असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. सारीच्या रुग्णांवर वेळीच उपचार झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.सारी तापाच्या आजारात जंतूसंसर्ग होऊन सूज येते़ त्याचबरोबर न्युमोनिया होऊन रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण खालावते़ त्यामुळे हृदय, मेंदू, किडनी निकामी होतात़ शरीरात जंतूसंसर्ग झाल्याने आजाराचे वेळेवर निदान होत नाही़ त्यामुळे तापाचे जीवाणू, विषाणू रक्तात मिसळतात़ रक्त तपासणीनंतरही आजाराचे निदान होत नाही़ त्यामुळे त्याचे रूग्ण लवकर लक्षात येत नाहीत.

मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यात सारीचे आतापर्यंत ११६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडून वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे़

जिल्ह्यात सारीचे रुग्ण आढळत असले तरी आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात आली आहे़. जे कन्टेन्मेंट झोन नाहीत, अशा ठिकाणी ५० घरांचे सर्वेक्षण करण्याची सूचना देण्यात आलेली आहे़ लोकांनी गणेशोत्सवात काळजी घ्यावी़ १ मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवावे तसेच मास्कचा वापर करावा़- डॉ़ बबिता कमलापूरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी़

काय आहेत लक्षणेया आजारामध्ये कोरोनाप्रमाणेच सर्दी, खोकला, ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ही लक्षणे असतात़ दवाखान्यात दाखल करून उपचार केले, तरच सारीच्या रुग्णांचे निदान होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी