शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस स्थानकात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 14:24 IST

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी ३७ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांची संख्या १,३३६ झाली आहे़.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाकोणतीच लक्षणे नसतांना अहवाल पॉझिटिव्ह

रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारी ३७ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांची संख्या १,३३६ झाली आहे़.

या अहवालामध्ये रत्नागिरीजिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकातील एका महिला कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता शासकीय कार्यालयांमध्येही कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.मंगळवारी दिवसभरात ३७ रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने रुग्णांची संख्या १,३३६ वर जाऊन पोहोचली आहे. नवीन रुग्णांमध्ये खेडमधील कळंबणी येथील १ रुग्ण, चिपळुणातील कामथे येथील १५ रुग्ण आणि रत्नागिरीतील १२, दापोलीतील ४, गुहागरातील १ आणि घरडामधील ३ रुग्णांचा समावेश आहे़ सद्यस्थितीत जिल्ह्यात ४९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मंगळवारी आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

कार्यालयातील एक प्रमुख विभागातील हा कर्मचारी असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण विभाग क्वारंटाईन करण्यात आला आहे. या अहवालानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्याचबरोबर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकातील एका महिला कर्मचाऱ्याचा अहवालही मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयातील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शहर पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी स्वॅब दिले होते. त्यातील एका महिला कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

या महिला कर्मचाऱ्यामध्ये कोणतीच लक्षण दिसत नसताना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस हादरून गेले आहेत.रत्नागिरी तालुक्यातील मंगळवारी आलेल्या अहवालांमध्ये वाटद खंडाळा परिसरातील २, झारणी रोड येथील १, जुना माळनाका येथील डॉक्टर, फिनोलेक्स कॉलनीतील १, आरोग्य मंदिर येथील २, नाटे येथील १, जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी १ आणि खासगी रुग्णालय १ डॉक्टर आणि १ परिचारिका कोरोनाबाधित सापडली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी