शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

corona in ratnagiri- चिमुरडीने वाचविले एका बालकाला, प्रसंगावधानामुळे होत आहे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 14:59 IST

देवरुख येथील केशवसृष्टी येथे राहणाऱ्या सुज्ञा उर्फ रमा सुहास थोरात या बालिकेने एका अडीच वर्षांच्या बालकाला सांडपाण्याच्या टाकीमध्ये पडता पडता वाचविले. तिच्या या समयसुचकतेमुळे, प्रसंगावधानामुळेच त्या बाळाला मदतीचा हात मिळाला. सुज्ञा (रमा)च्या या कृत्यामुळे दोन्ही कुटुंबातून तिचे कौतुक होत आहे.

ठळक मुद्दे चिमुरडीने वाचविले एका बालकालाप्रसंगावधानामुळे होत आहे कौतुक

सचिन मोहिते देवरुख : येथील केशवसृष्टी येथे राहणाऱ्या सुज्ञा उर्फ रमा सुहास थोरात या बालिकेने एका अडीच वर्षांच्या बालकाला सांडपाण्याच्या टाकीमध्ये पडता पडता वाचविले. तिच्या या समयसुचकतेमुळे, प्रसंगावधानामुळेच त्या बाळाला मदतीचा हात मिळाला. सुज्ञा (रमा)च्या या कृत्यामुळे दोन्ही कुटुंबातून तिचे कौतुक होत आहे.बऱ्यांचदा लहान मुले अधिक हजरजबाबीपणा दाखवतात आणि साऱ्यांनाच आश्चर्यचकीत करतात. आपल्या हुशारीने ती मोठ्यांनाही चक्रावून सोडतात.एखाद्या अवघड प्रसंगात असं काही करतात की त्यामुळे मोठी माणसेही तोंडात बोटे घालतील. याचीच अनुभूती देवरूखच्या सुज्ञा उर्फ रमा सुहास थोरात या तीन वर्षाच्या चिमुरडीने दिली.सुज्ञा उर्फ रमा सुहास थोरात ही तीन वर्षे १० महिन्यांची मुलगी. संगमेश्वरचे तहसीलदार सुहास थोरात यांची ती कन्या. बुधवारी दुपारी सुज्ञा अंगणात खेळत होती. शेजारच्या लिमये यांचा अडीच वर्षांचा नातू श्रीकर हा तिच्या सोबत खेळण्यासाठी आला होता. खेळता खेळता घरच्यांची नजर चुकवून हे दोघेही जरा बाजूला गेले.घराजवळच असलेल्या मोठ्या सांडपाण्याच्या टाकीमध्ये त्यांचे खेळणे पडले. हे खेळणे काढण्यासाठी पुढे झालेला अडीच वर्षांचा श्रीकर हा त्या टाकीमध्ये पाय घसरुन पडणार हे सुज्ञा हिच्या लक्षात येताच तिने क्षणाचाही विलंब न लावता श्रीकरचा हात घट्ट पकडून ठेवला.

यावेळी दोघेही ओरडल्याने श्रीकरच्या घरच्यांनी त्यांचा आवाज ऐकून त्या दिशेने धाव घेतली आणि पडणाºया श्रीकरला पडता पडता सावरला. सुज्ञाच्या समयसुचकतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे धोका टळला. तिने दाखवलेल्या धाडसामुळे श्रीकरला मदतीचा हात मिळाला आणि त्याचे प्राण वाचले. देवरूखात सोशल मीडियावरही याच विषयाची चर्चा अधिक होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी