शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

coroana in ratnagiri -कोरोनामुक्तांना निरोप देताना रूग्णालय हसलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 14:46 IST

रूग्ण बरे होऊन घरी जाताना रूग्णांसोबतच रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका खुश होतातच. पण निरोप द्यायला ते दारापर्यंत आले तर... त्यांनी जाता जाता पुष्पगुच्छ हातात ठेवला तर... सगळं वातावरणच बदलून जातं. आज शनिवारी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातच असंच झालं.

ठळक मुद्देकोरोनामुक्तांना निरोप देताना रूग्णालय हसलंकुटुंबाला टाळ्या वाजवून दिला निरोप

रत्नागिरी : रूग्ण बरे होऊन घरी जाताना रूग्णांसोबतच रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका खुश होतातच. पण निरोप द्यायला ते दारापर्यंत आले तर... त्यांनी जाता जाता पुष्पगुच्छ हातात ठेवला तर... सगळं वातावरणच बदलून जातं. आज शनिवारी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातच असंच झालं.

कोरोनाबाधीत म्हणून ११ दिवस रूग्णालयात उपचार घेणारं सहा महिन्याचं बाळ आणि त्याच्या नातेवाईक असलेल्या दोन कोरोनाबाधीत महिला ठणठणीत बऱ्या होऊन घरी गेल्या आणि त्यांना निरोप देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व परिचारिका रूग्णालयाच्या दारापर्यंत आले आणि कोरोनाच्या भीतीच्या वातावरणातही जिल्हा रूग्णालय काही क्षण हसलं... गहिवरलं...!रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील एका महिलेला कोरोना झाला असल्याचे ७ एप्रिलला निष्पन्न झाले. त्यानंतर १0 एप्रिल रोजी त्या महिलेची नातेवाईक असलेल्या दुसºया महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १४ एप्रिल रोजी त्या महिलांचे नातेवाईक असलेल्या सहा महिन्याच्या एका बाळाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला होता.इतक्या दिवसांच्या उपचारानंतर आता या तिघांचेही अहवाल निगेटीव्ह आले असल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. शुक्रवारी या बाळाचा दुसरा अहवालही निगेटीव्ह आला. दोन्ही महिलांचे अहवाल गुरूवारी निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे शनिवारी त्यांना घरी पाठवण्यात आले.

जिल्हा शल्य चिकित्सिक डॉ. अशोक बोल्डे, बाळावर उपचार करणारे डॉ. दिलीप मोरे यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिका या साऱ्यांनी या कुटुंबाला टाळ्या वाजवून निरोप दिला. आणि कोरोनाच्या छायेतही जिल्हा रूग्णालय हसलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटल