खेड: तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस या विषाणूने डोक वर काढले आहे. त्याचा धोका लहान मुलांना हाेणार असल्याचे आराेग्य विभागाने सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी कोरोनामुक्त गाव प्रशासनाने हाती घेतले आहे. लॉकडाऊनच्या कामाला जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन आमदार योगेश कदम व भास्कर जाधव यांनी खेड येथील आढावा बैठकीत केले.
५४५ तक्रारींचे निवारण
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकासकामासंदर्भात, तसेच येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सार्वजनिक, वैयक्तिक तक्रारी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभागाकडे केल्या जातात. १३ महिन्यांच्या कालावधीत अनेक तक्रारी आल्या. त्यामधल्या ५४५ तक्रारींचे निवारण करण्यात आले.
निवळी घाट असुरक्षित
रत्नागिरी : ऐन पावसाळ्यातच बावनदी - निवळी घाटात दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सुरक्षिततेसंदर्भातील संभ्रम कायम राहणार आहे. चाैपदरीकरणाच्या कामासाठी या भागात माेठ्या प्रमाणात डाेंगराची कटाई करण्यात आली आहे. त्यामुळे दरड काेसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक अधिक धोकादायक ठरणार आहे.
खड्डयांचे साम्राज्य
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन - करजुवे मार्गावर मोठया प्रमाणावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. त्यातून प्रवास करताना प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी.