रत्नागिरी : येथील ठेकेदार अभिजित पाटणकर खूनप्रकरणी मंगळवारी अटक केलेल्या तिघा संशयितांना बुधवारी येथील न्यायालयात हजर केले असता ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूूत्रधार अद्याप फरार आहे. त्याच्यासह आणखी काही आरोपींच्या मागावर पोलिसांना पाठविण्यात आले आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून चार गोळ्या झाडून अभिजित याचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. अभिजित खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांमध्येरिहाज नदाफ (वय २०, कोकणनगर, रत्नागिरी), फजेल काझी (२०, मजगाव), आसीफ खान (२४, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. रत्नागिरी शहरातील सन्मित्रनगर येथे राहणाऱ्या अभिजित शिवाजी पाटणकर (२७) याच्यावरगोळ्या झाडून त्याचा मृतदेह कारवांचीवाडी-पोमेंडी रेल्वे पुलाखालील टाकल्याचे गेल्या रविवारी उघडकीस आले होते. (प्रतिनिधीसूत्रधारासह आणखी संशयितांवर नजर...या खून प्रकरणातील खरा सूत्रधार अजून फरार आहे. त्याच्यासह आणखी काही संशयितांवरही पोलिसांची नजर आहे. पकडण्यात आलेल्या तीन संशयित आरोपींकडून आणखी काही माहिती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या खुनाचा उलगडा झाला असून, अनेक भक्कम धागेदोरे हाती आले आहेत. केवळ आरोपी हाती येणे बाकी आहे, असा दावाही केला जात आहे.रिव्हॉल्व्हर, गोळ्या तपासणीसाठी मुंबईत -पाटणकर खून प्रकरणात गुन्हेगारांनी वापरलेले रिव्हॉल्व्हर संगमेश्वर येथून जप्त करण्यात आले आहे. पाटणकर याच्यावर झाडण्यात आलेल्या व शवविच्छेदनात आढळलेल्या गोळ्या तसेच रिव्हॉल्व्हर हे तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. त्याबाबतच्या तपासणीनंतर याच रिव्हॉल्व्हरमधून झाडलेल्या त्या गोळ्या आहेत का, याबाबतची माहिती मिळणार आहे.
ठेकेदार खुनातील तिघांना कोठडी
By admin | Updated: September 2, 2015 23:23 IST