शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘कनेक्टिव्हिटी’ने गुहागर पर्यटनाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:37 IST

संकेत गोयथळे । लोकमत न्यूज नेटवर्क गुहागर : १५ वर्षांपूर्वी झालेला राई-भातगाव पूल व धोपावे फेरीबोट सेवा गुहागरच्या पर्यटन ...

संकेत गोयथळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगुहागर : १५ वर्षांपूर्वी झालेला राई-भातगाव पूल व धोपावे फेरीबोट सेवा गुहागरच्या पर्यटन वाढीचा टर्निंग पॉर्इंट ठरला होता. यापुढील काळात होणारे मुंबई-गोवा चौपदरीकरण व गुहागर-विजापूर महामार्ग हे पुन्हा एकदा गुहागर पर्यटनवाढीसाठी टर्निंग पॉर्इंट ठरणार आहेत. तालुक्याची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढल्याने गुहागरातही पर्यटन प्रवाहात आले आहे.१५ वर्षांपूर्वीचा विचार करता गुहागरमध्ये फक्त हेदवी, वेळणेश्वर, व्याडेश्वरसाठी येणारा भाविक पर्यटकच येत होता. गुहागरला यायचे झाल्यास तसेच चिपळूणहून अन्यत्र कुठे जायचे झाल्यास पुन्हा चिपळूणला मागे फिरुन जावे लागत असे. यामुळे गुहागरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोजकी होती. मात्र, पंधरा वर्षांपूर्वी झालेला राई-भातगाव पूल व धोपावे फेरीबोट सेवेमुळे रत्नागिरी व दापोली असे दोन तालुके जोडले गेले. येथूनच खºया अर्थाने गुहागरचे पर्यटन वाढू लागले. दापोली तालुका मुंबई, पुणेहून येण्यासाठी जवळचा आहे. यामुळे दापोलीत यापूर्वीच पर्यटनाची सुरुवात झाली, तर गणपतीपुळे हे अनेक वर्षांपासून सर्वांनाच परिचित होते. पर्यटनतज्ज्ञांच्या मतानुसार पर्यटनदृष्ट्या गुहागरपेक्षा दापोली दहा वर्षांनी, तर गणपतीपुळे पन्नास वर्षांनी पुढे आहे. गुहागरशी या तालुक्यांची कनेक्टिव्हिटी वाढल्याने या दोन तालुक्यांबरोबरच गुहागरही पर्यटन प्रवाहात झाले.गुहागर शहराचा विचार करता वारंवार गुहागर नाक्यात होणारी वाहतूक कोंडी गुहागर शहराच्या पर्यटनवाढीचा मुख्य अडसर बनत आहे. गेली अनेक वर्षे हा विषय वादाचा ठरत आहे. या ठिकाणी शासकीय जागेत असलेली बांधकामे अधिकृत की अनधिकृत यावर शासन कारवाई का करत नाही, असा सवाल ग्रामस्थांतून नेहमी केला जात आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन अनेकवेळा स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक याच्यात शाब्दिक वादापासून हाणामारीपर्यंतची वेळ आली आहे.नव्याने गुहागर - विजापूर महामार्गासाठी रस्ता मोजणीचे काम गेली काही महिने सुरु आहे. या रस्त्याचा झिरो पॉर्इंट गुहागर नाक्यातून सुरु होतो. यावेळी सुरु होणारे काम गुहागर नाक्यातून सुरु व्हावे, अशी गुहागरातील ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे.गुहागरनंतर पालशेत बाजारपेठेतील अरुंद रस्त्यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी होते. बारभाईमार्गे बायपास रस्ता करुनही वाहतूक कोंडी टळली जाऊ शकते. यासाठी गुहागर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मंत्रालयात पाठवलेला प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.