शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

परिषद भवनातील कामात अपहार

By admin | Updated: June 9, 2015 00:11 IST

अंकुश नाही : नेमका टक्का कोणाला...

रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराची सुरुवात परिषद भवनातूनच झाली आहे. परिषद भवनातील मीटर रूमच्या दुरुस्तीचे काम दाखवून ५० हजार रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हे काम न करताच रत्नागिरी बांधकाम विभागाने हे बिल खर्ची टाकले आहे.जिल्हा परिषदेमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये विकासकामे करण्यात येतात. मात्र, या कामांच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात येतो. टक्केवारीमुळे ठेकेदार मंडळींकडून दर्जाहीन कामे केली जातात. कोणतेही काम असले, तर लोकप्रतिनिंधीपासून अधिकाऱ्यांपर्यंत टक्का मोजण्यात येतो.विकासकामे करताना सर्वांना सांभाळून घेतल्याशिवाय कामे होत नाहीत. तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची मर्जी राखणाऱ्या ठेकेदारानाच विकासकामांचा ठेका दिला जातो. मग ते काम टिकाऊ झाले नाही तरी चालेल. त्याची तपासणी करणारेही तेच अधिकारी असतात. त्यामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर काही दिवसांत खड्डे पडलेले दिसून येतात. परिषद भवनातही काम दाखवून शासनाची रक्कम लाटण्याचा प्रकार घडला आहे. मार्च, २०१४ पूर्वी ५० हजार रुपयांचे बिल खर्च करण्यात येत आहे. परिषद भवनाच्या तळ मजल्यावर असलेल्या मीटर रुमच्या दुरुस्तीचे काम काढण्यात आले होते. प्रत्यक्षात या मीटर रुमची काहीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. काम न करताच बिल खर्ची घालण्यात आले आहे. हे पैसे कोणाच्या घशात घालण्यात आले, त्याचा शोध नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी पे्ररणा देशभ्रतार यांनी घ्यावा. एकूणच प्रकाराची चौकशी झाल्यास परिषद भवनातील इतर कामांमध्ये झालेला भ्रष्टाचारही या अनुषंगाने उघडकीस येण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी संबंधितांवर कारवाई करण्याची मानसिकता हवी, अशी अपेक्षा कर्मचारीच करत आहेत. (शहर वार्ताहर)काम न करताच बिले खर्ची काम न करताच रत्नागिरी बांधकाम विभागाने बिल खर्ची कसे टाकले.जिल्हा परिषदेमध्ये विविध योजनांतून ग्रामीण भागाचा विकास होतो शक्य. परिषद भवनातही काम दाखवून शासनाची रक्कम लाटण्याचाच प्रकार उघड. मीटर रूमची दुरूस्ती गेली कुठे असा प्रश्न विचारला जातोय. विकासकामे करताना मर्जी कुणाची राखली जातेय..